विशेष प्रतिनिधी
भिवंडी : हिंदू समाज जागा झाला आहे .आपण एकत्र झालो नाही तर आता मिरवणुकीवर दगड मारतात, उद्या घरात पूजा करू देणार नाहीत.जिहादी जास्त वळवळ करीत असतील तर त्यांना धडा शिकवणार, असल्याचा इशारा मत्स्य व्यवसाय व बंदर मंत्री नितेश राणे यांनी दिला.
भिवंडीतील भारत माता युवा प्रतिष्ठान गोपाळ नाट्य मंडळ पुरस्कार प्रदान सोहळ्यात ते बोलत होते. राणे म्हणाले, मला भिवंडीत या कार्यक्रमाच्या निमित्ताने भिवंडी मध्ये येण्याची संधी दिली.अनेक महिन्यापासून माझी इच्छा होती की मला भिवंडीला जायचे आहे. हिंदू समाजाशी काही गोष्टी बोलायच्या आहे .कारण का तर इथे जास्त हिरवे साप वळवळ करतात असं कानावर वारंवार येत होते. ती माझी इच्छा दादा वेदकांमुळे आणि दीपक पाटलांमुळे पूर्ण झाली .
राणे म्हणाले, आम्ही त्या पद्धतीचे कार्यकर्ते आहोत ज्याला तुम्ही पाकिस्तान मध्ये जाऊन उभं केलं आणि सांगितलं की, इथे भगवा झेंडा लावा तरी आम्ही ते करू. जेथे सगळं काही भगवमय आहे तेथे जाऊन काय बोलणार? जेथे जास्त वळवळ करणारे आहेत, हिंदूंना दाबण्याचा प्रयत्न करतात तिथे जाऊन जोरात काही गोष्टी त्यांना कानापर्यंत पोहोचविल्या पाहिजेत म्हणून आवर्जून मी भिवंडीत आलो आहे.
या राज्यामध्ये हिंदू समाजाने हिंदुत्ववादी विचाराचे सरकार निवडलेल आहे. आमच्यासारखे असंख्य सत्तेमध्ये बसवलेल आहे .म्हणून यापुढे भिवंडी मध्ये जास्त वळवळ झाली नाही. तुमच्या भिवंडी मध्ये हिंदूंची संख्या कमी असली तरी आमच्या देशामध्ये हिंदू 90% राहतात हे त्यांनी विसरू नये. हिंदू समाजाला मी सांगेल तुम्ही कसली चिंता करू नका. ते कसे बाहेर येतात किती हिम्मत दाखवतात हे आता सरकार म्हणून आम्हाला बघायचे आहे, असे आव्हान राणे यांनी दिले.
हिंदू मुस्लिम भाईचारा सर्व धर्म समभावाची टेप वाजवणारे महाराष्ट्रात आहे. सर्वधर्मसमभाव, हिंदू मुस्लिम तहाजीब शिकवतात, गणेशोत्सवात दगडफेक करताना हे कुठे होते, हे या भडव्यांना विचारायला आलो आहे असे सांगून राणे म्हणाले, ईद व मोहरम मिरवणुकी वर कधी हिंदुनी दगडफेक केली नाही.तुम्ही रस्त्यावर धिंगाणा घालता. मग आमच्या गणेशोत्सव हनुमान जयंती मिरवणुकीवर दगडफेक का होते? या पुढे असे कृत्य झाले तर त्याला उत्तर दिले जाईल पोलिसांना माहित आहे सत्तेवर कोण आहे? गृहमंत्री कोण आहे? लव्ह जिहाद, लॅन्ड जिहाद भिवंडीत सुरू आहे. याची माहिती आमच्या पर्यंत पोहचवा.आम्ही यांना ठेचून काढू.
हिंदू लोकांना संरक्षण मागायची गरज पडली नाही पाहिजे .सरकार आपले आहे. आम्ही काय सरकार मध्ये गोट्या खेळतो का असा सवाल करत राणे म्हणाले, आम्ही नियम पाळतो मग त्यांनी का नाही पाळायचे .त्यांचे धिंगाणे बारा वाजले तरी सुरू राहतात.आता बघा नियम सर्वांना सारखे लावा. काल बघा नाशिक मध्ये काय झालं बघितलं असेल आमच्या देवा भाऊच्या सरकारने घाण काढून टाकली. सरकार आता तुमचे आहे हे लक्षात घ्या. प्रचार आणि प्रचार आणि हिंदू धर्माच्या धाक वाढवला नाही तर मग नंतर तुम्ही उगाच आम्हाला विचारत बसू नका.
Jihadists will be taught a lesson if they move too much, warns Nitesh Rane
महत्वाच्या बातम्या
- Sanjay Nirupam : एसआरए प्रकल्पांमध्ये हिंदू कमी करून हाऊसिंग जिहाद, संजय निरुपम यांचा आरोप
- धक्कापुरुष कायमचा घरी बसविला , एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरे यांच्यावर टीका
- Raj Thackeray मराठी भाषा गौरव दिनी मनसेचे पुस्तक प्रदर्शन, राज ठाकरेही आवडीची कविता सादर करणार
- Sharad Pawar शरद पवार यांनी सांगितलं आपल्या पंतप्रधानपदाचा किस्सा, नाव शॉर्टलिस्ट पण…