विशेष प्रतिनिधी
मुंबई : विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढूनही दारुण पराभव झाला. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका आणि प्रामुख्याने मुंबई महापालिकेत एकला चलो रे ची भूमिका काँग्रेसच्या नेत्यांनी मांडली आहे. स्वबळावर लढण्याची मागणी केली आहे. congress
मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सांताक्रुझमधील गॅलेक्सी हॉटेलमध्ये काँग्रेस पक्षाची महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीमध्ये काँग्रेस नेत्यांनी पालिका निवडणूक स्वबळावर लढण्याची इच्छा व्यक्त केल्याची चर्चा समोर आली आहे. तसेच, मनसेसोबत युती करण्यासही काँग्रेस नेत्यांचा नकार असल्याचे समोर आले आहे. या बैठकीला महाराष्ट्र प्रभारी चेन्नीथला यांच्यासह काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, मुंबई अध्यक्ष वर्षा गायकवाड, भाई जगताप आणि ज्योती गायकवाड हे नेते उपस्थित होते.
काँग्रेसच्या बहुतांश नेत्यांनी एकमुखाने पालिका निवडणुकीसाठी एकला चलो रेची भूमिका मांडली. समोर आलेल्या माहितीनुसार, या बैठकीत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या संभाव्य युतीवरही सल्लामसलत करण्यात आली. त्यामध्ये राज ठाकरे यांच्या नेतृत्वात मनसेला महाविकास आघाडीत घेण्यास कोणतीही तडजोड न करण्याचा निर्णय घेण्यात आला. खासकरून, या प्रकरणी काँग्रेसच्या दिल्लीतील हायकमांडशी अनुकूल चर्चा सुरू आहे. पण राज्यातील नेते मनसेसोबत जाण्यास फारसे अनुकूल नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या मतदारांचा शिवसेना ठाकरे गटाला फायदा होतो, पण त्यांची मते काँग्रेसला मिळत नसल्याचे मत काँग्रेस नेत्यांनी या बैठकीत मांडले आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसने ठाकरे बंधूंसोबत युती केली किंवा ही निवडणूक महाविकास आघाडी म्हणून लढवली तर त्याचा फटका काँग्रेसला बसेल. पण याचा फायदा शिवसेना ठाकरे गटाला होईल, अशी चर्चा यावेळी काँग्रेसच्या नेत्यांमध्ये झाल्याचे समोर आले आहे. मुंबई महानगरपालिकेत कोणत्याही जागेवर मैत्रीपूर्ण लढत नसावी. काँग्रेसने पूर्ण ताकदीने जोर लावून लढावे, असे काँग्रेस नेत्यांनी पक्षश्रेष्ठींना सांगितले. अद्याप याबाबत कोणतेही अधिकृत विधान काँग्रेसच्या नेत्यांकडून आलेले नाही. पण, दोन ते तीन दिवसांत आमची भूमिका जाहीर करणार असून सध्या कोणाशीही चर्चा केली नसल्याची माहिती रमेश चेन्नीथला यांनी माध्यमांना दिली.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी सांगितले की, मनसेसोबत युती करण्यासाठी आमचे काँग्रेससोबत बोलणी सुरु असल्याचे सांगितले. याबाबत काँग्रेस नेत्यांनी मात्र नकार दिला. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी चेन्नीथला यांना याबाबत विचारले असता ते म्हणाले की, “आमचे असे काही बोलणे सुरु नसून मनसेबाबत दोन ते तीन दिवसांत याबाबत निर्णय घेऊ,” असे स्पष्ट केले. तसेच, मुंबई अध्यक्ष वर्षा गायकवाड म्हणाल्या की, “संजय राऊत त्यांच्या पक्षाची भूमिका मांडत असतात. पण, आमच्या पक्षाबद्दल आम्ही पक्षश्रेष्ठींशी चर्चा केल्यानंतर भूमिका जाहीर करू.” असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
leaders demand to contest local body elections on their own – congress
महत्वाच्या बातम्या
- Cooperation Minister, : लोकांना कर्जमाफीचा नाद, सहकार मंत्र्यांच्या असंवेदनशील विधानावर संताप, म्हणण्याचा अर्थ ताे नव्हता असा खुलासा
- Nitesh Rane : एमआयएमच्या नावाखाली हिरव्या सापांची वळवळ, पुन्हा सभा हाेऊ द्यायची का विचार करू, नितेश राणेंचा इशारा
- Ajit Pawar : तुम्हाला पाठीशी घालायला आम्ही मोकळे नाही, गैरप्रकार करणाऱ्यांना अजित पवार यांचा इशारा
- महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन निवडणुकीत रंगणार ‘पवार विरुद्ध मोहोळ’ सामना