विशेष प्रतिनिधी
नागपूर : Nana Patole महाराष्ट्र कर्जबाजारी होत आहे. लाडक्या बहिणीला पुढे करत बदनाम करण्याचे काम सुरू आहे पण हे सपशेल खोटं आहे, सरकारने श्वेत पत्रिका काढून पैसा कुठे जात आहे हे सांगितले पाहिजे. नाही तर आम्ही याची काळी पत्रिका जाहीर करु. आमच्याकडे सर्व आकडे आहेत, असा इशारा काॅंग्रेसचे नेते नाना पटाेले (Nana Patole) यांनी दिला आहे.
पत्रकारांशी बाेलताना पटाेले (Nana Patole) म्हणाले, मनोज जरांगे यांच्या माध्यमातून जी परिस्थिती निर्माण झाली या काळात किती महाराष्ट्र लुटला याची माहिती आमच्याकडे आली आहे. महाराष्ट्र कर्जबाजारी करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मित्राच्या ताब्यात देण्याचे काम सुरू आहे . शेतकरी कर्जमाफी का केली नाही, शेतकऱ्यांना द्यायला सरकारकडे पैसे नाही आणि मोदींच्या मित्रांना देण्यासाठी सरकारकडे पैसे आहेत का? हा प्रश्न निर्माण झाला आहे.
नाना पटोले म्हणाले की, ज्या पद्धतीने कमी भावामध्ये अदानीला महाराष्ट्र विकण्याचे काम केले जात आहे हे आपल्याला दिसून येत आहे. यामुळे गंभीर मोठा आर्थिक प्रश्न महाराष्ट्रासमोर उभा राहिला आहे. यासाठी महायुती सरकार कारणीभूत आहे/
नाना पटोले म्हणाले की, महाराष्ट्राच्या सीमेवर टोल बांधण्यात आलेले आहेत. 2017 मध्ये केंद्र सरकारने सांगितले की आपण जीएस टी सुरू केले आहे, तुम्ही तुमचे टोल बंद करा.यामुळे टोल चोरी होणार नाही. पण हे टोल अजूनही सुरू आहेत. हे काम सध्या अदानींकडे आहे ते बंद करण्यासाठी अदानींकडून साडेसात हजार कोटीची मागणी केली जात आहे. या माध्यमातून ही लुट सुरू आहे.
Maharashtra is in debt, Nana Patole demands that the government issue a white paper
महत्वाच्या बातम्या
- Laxman Hake : मराठा आरक्षण आंदोलनापुढे हतबल होऊन ओबीसींचे आरक्षण संपवले, लक्ष्मण हाके न्यायालयात दाद मागणार
- cabinet meeting : दिव्यांगांच्या अर्थसहाय्यात एक हजार रुपयांची वाढ, मेट्राेला गती : राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय
- Navnath Ban : राऊतांनी राहुल गांधींच्या अपयशी प्रयोगांचे कौतुक थांबवावे- नवनाथ बन
- Gunaratna Sadavarte : मुख्यमंत्री ब्राह्मण समाजाचे आहेत म्हणून त्यांना टार्गेट करू नका; सदावर्तेंचा इशारा