विशेष प्रतिनिधी
बारामती : शरद पवारांनीच मनोज जरांगे यांना उभे केले. त्यांनीच मनोज जरांगे नावाचे भूत महाराष्ट्राच्या मानगुटीवर बसवले असल्याची टीका ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी केली आहे. Laxman Hake
राज्य सरकारने मराठा आरक्षणाच्या संदर्भातील मनोज जरांगे यांच्या मागण्या मान्य केल्यानंतर राज्यातील ओबीसी समाज नाराज झाला आहे. ओबीसी नेतेलक्ष्मण हाके यांनी देखील याचा जोरदार निषेध व्यक्त करणे सुरू केले आहे. बारामती येथे ओबीसींचा मोर्चा काढत पवार कुटुंबावर जोरदार हल्लाबोल केला. शरद पवारांनीच मनोज जरांगे यांना उभे केले. त्यांनीच मनोज जरांगे नावाचे भूत महाराष्ट्राच्या मानगुटीवर बसवले असल्याची टीका केली. Laxman Hake
लक्ष्मण हाके म्हणाले, शरद पवार मत आमची घेतात आणि जरांगेंना पाठिंबा देतात. मंडल आयोग शरद पवार यांनी लागू केला असे जर कोणी म्हटले तर त्याचे कानफाड फोडा, असे हाके यांनी म्हटले. तसेच देशभरात मंडल आयोग लागू झाला होता, फक्त महाराष्ट्रातच लागू झाला नव्हता. मंडल आयोगाची चळवळ शेकापचे दि. बा. पाटील, बबनरावजी ढाकणे, शिवाजीभाऊ शेंडगे, गोपीनाथ मुंडे, छगन भुजबळ, अरुण कांबळे, बाळासाहेब आंबेडकर या सगळ्या माणसांनी मंडल आयोग लागू केल्याचे हाके म्हणाले Laxman Hake
कुटुंबाच्या बाहेर कारखाने जाऊ न देणारे, कुटुंबाच्या बाहेर आमदारकी खासदारकी न जाऊ देणारे म्हणत लक्ष्मण हाके म्हणाले, शरद पवार 400 संस्थांचे अध्यक्ष आहेत. रयत शिक्षण संस्थेचा अध्यक्ष हा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री राहील असा नियम होता. मात्र, त्यामध्ये खाडाखोड केली आणि शरद पवार अध्यक्ष झाले. वसंतदादा शुगर इंस्टीट्यूटचे अध्यक्ष शरद पवार झाले, असेही हाके यांनी म्हटले.
अजित पवारांवर टीका करताना लक्ष्मण हाके म्हणाले, अजित पवार म्हणाले कॅनलच्या कंपाऊंडवर गोधडी वाळत घातली तर बघा. कंपाऊंड तुझ्या बापाचे आहे का? असा सवाल हाके यांनी केला. महाराष्ट्रातील सामान्य लोकांच्या घामाचे कष्टकऱ्यांचे दीन दलितांचे पैसे महाराष्ट्राच्या तिजोरीत जातात. सत्तेतून पैसा, पैशातून पुन्हा कारखाना असे काम हे करत आहेत. सत्ता कोणाचीही असो मंत्रिमंडळात हे असतातच, अशी टीका हाके यांनी केली आहे.
लक्ष्मण हाके म्हणाले, पूर्वी ओबीसी विरुद्ध ओबीसी अशी लढत होत होती. आता जर ओबीसीचे आरक्षण पडले तर ओबीसी विरुद्ध ड्यूप्लिकेट ओबीसी अशी लढत होणार आहे. पुढच्या निवडणुकीत ड्यूप्लिकेट ओबीसी विरुद्ध ड्यूप्लिकेट ओबीसी अशी लढत होणार असल्याचे हाके यांनी म्हटले आहे.
दरम्यान, लक्ष्मण हाके यांचे भाषण सुरू असतानाच वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांचा फोन आला. आंबेडकरांनी फोनवरून उपस्थित जनतेशी संवाद साधला. आंबेडकर म्हणाले, जबरदस्ती दिलेले आरक्षण आहे, आपल्याला रस्त्यावर उतरावे लागेल, असे यावेळी बोलताना आंबेडकरांनी म्हटले.
A ghost named Manoj Jarange has been placed on the neck of Maharashtra, Laxman Hake’s attack
महत्वाच्या बातम्या
- Laxman Hake : मराठा आरक्षण आंदोलनापुढे हतबल होऊन ओबीसींचे आरक्षण संपवले, लक्ष्मण हाके न्यायालयात दाद मागणार
- cabinet meeting : दिव्यांगांच्या अर्थसहाय्यात एक हजार रुपयांची वाढ, मेट्राेला गती : राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय
- Navnath Ban : राऊतांनी राहुल गांधींच्या अपयशी प्रयोगांचे कौतुक थांबवावे- नवनाथ बन
- Gunaratna Sadavarte : मुख्यमंत्री ब्राह्मण समाजाचे आहेत म्हणून त्यांना टार्गेट करू नका; सदावर्तेंचा इशारा