विशेष प्रतिनिधी
पुणे : मुंबई महापालिकेसाठी ठाकरे बंधू एकत्र येणार आहेत, अशी चर्चा रंगली आहे. दोघे भाऊ एकत्र येत आहेत. ही चांगली गोष्ट आहे. मात्र त्यांच्या एकत्र येण्यामुळे राजकारणात फारसा फरक पडणार नाही. ठाकरे बंधू असो की इतर कोणीही असो. आगदी गामपंचायत, पंचायत समितीपासून थेट मुंबई महापालिकेत सत्ता महायुतीचीच (आमची) येणार आहे. Uday Samant
एकनाथ शिंदे यांचं नाणं खणखणीत असल्यानेच तीन वर्षांपूर्वी उठाव केला असून विधानसभा निवडणुकीत ते सिद्ध केले आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार आहे, असा विश्वास उद्योग मंत्री उदय सामंत यांनी पुण्यात पत्रकार परिषदेत व्यक्त केला.
शिवसेना एकनाथ शिंदे पक्षात मोठ्या प्रमाणात इतर पक्षातून नेते, कार्यकर्ते प्रवेश करत आहेत. या कार्यकर्त्यांना पद देण्यासाठी मी आलो आहे. कोणाचेही पद काढून घेण्यासाठी आलो नाही, अशी मिश्किल टिपणी उदय सामंत यांनी पुण्यातील पदाधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर केली. याप्रसंगी शिवसेना पक्षाचे पुणे शहरप्रमुख रवींद्र धंगेकर आणि प्रमोद भानगिर, रमेश कोंडे उपस्थित होते.
उदय सामंत म्हणाले की, प्रत्येक पक्षाला आपली ताकद वाढवायचा पूर्ण अधिकार आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थाच्या कोणत्याही पक्षाने स्वबळाचा नारा दिला तर काहीही वावगे नाही. मात्र, राज्यात या निवडणुकीसाठी महायुतीतील तीनही पक्ष एकत्रच लढणार आहेत. त्याबाबतचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे घेतील. त्यामुळे आमची तयारी पूर्ण झाली आहे. कोणत्याही परिस्थितीत ठाकरे बंधू एकत्र आल्याने काहीही फरक पडत नाही. लोकं त्यांना स्वीकारत नाही, अनेक वेळा आपण पाहिलेले आहे. ठाकरे बंधू एकत्र येण्याचा महायुतीला कोणताही फटका बसणार नाही, तर ते बंधू एकत्रच संपणार आहेत.
Mahayuti will fight the local body elections together; Uday Samant assures
महत्वाच्या बातम्या
- Laxman Hake : मराठा आरक्षण आंदोलनापुढे हतबल होऊन ओबीसींचे आरक्षण संपवले, लक्ष्मण हाके न्यायालयात दाद मागणार
- cabinet meeting : दिव्यांगांच्या अर्थसहाय्यात एक हजार रुपयांची वाढ, मेट्राेला गती : राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय
- Navnath Ban : राऊतांनी राहुल गांधींच्या अपयशी प्रयोगांचे कौतुक थांबवावे- नवनाथ बन
- Gunaratna Sadavarte : मुख्यमंत्री ब्राह्मण समाजाचे आहेत म्हणून त्यांना टार्गेट करू नका; सदावर्तेंचा इशारा