विशेष प्रतिनिधी
मुंबई : Uddhav Thackeray : राज्यात मार्च 2023 पासून 14 हजार कोटींची जाहीर झालेली रक्कम शेतकऱ्याला अद्यापही मिळालेली नाही. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शेतकऱ्यांच्या वतीने हात जोडून विनंती करतो की, शेतकऱ्याला सरसकट कर्ज मुक्त करावे, अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी केली आहे.
मराठवाड्यात झालेल्या नुकसानीची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बुधवारी पाहणी केली. त्यानंतर गुरुवारी उद्धव ठाकरे यांनी लातूर, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, जालना या जिल्ह्यात जाऊन पाहणी केली. याबाबतची माहिती आणि शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्याची मागणी करण्यासाठी शनिवारी ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेतून त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हात जोडून शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा, अशी विनंती केली.
ठाकरे म्हणाले की, मी नुकताच धाराशिव आणि लातूर येथे पूरग्रस्त पाहणी दौरा केला, अतिशय विदारक परिस्थिती आहे. पीकं हाताशी आले होते, ते पूर्ण नष्ट झाले आहेत. शेतामध्ये चिखल झाला होता, यावेळी शेतकरी मला बोलले. तुम्ही जी कर्जमाफी केली तशी कर्जमाफी आता करायला सांगा. सरकारने दिलेली आणि जाहीर केलेली मदत तुटपुंजी आहे, जमीन पीक घेण्यायोग्य करावी लागणार आहे, त्याला 2 ते 3 वर्ष लागतील. त्यासाठी, 1 एकराला 5 लाख रुपये खर्च लागणार आहे. मेहनत आणि खर्च दोन्हीही यासाठी लागणार आहे. शेतकऱ्याच्या डोक्यावर कर्ज आहे, तो आता फेडणार कसं?
पूरग्रस्त भागातील शेतकऱ्यांच्या मुलांची वह्या-पुस्तकं वाहून गेली आहेत, ती घ्यायची कशी? असा प्रश्न त्यांच्यासामोर आहे. गावातील 31 वर्षाच्या मुलाने आत्महत्या केली, त्यावर कर्ज होतं 2 लाखांचे. माझ्याकडे कागदं आहेत, 14 हजार कोटी रुपये मदत अजूनही शेतकऱ्यांकडे पोहोचली नाही. मुख्यमंत्री म्हणतात मला राजकारण आणायचे नाही, मुख्यमंत्री यांना विचारलं मदत कधी मिळणार? तर ते म्हणतात राजकारण करू नको. राज्यात मार्च 2023 पासून 14 हजार कोटींची जाहीर झालेली रक्कम शेतकऱ्याला अद्यापही मिळालेली नाही, त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस यांना शेतकऱ्यांच्या वतीने हात जोडून विनंती करतो की, शेतकऱ्याला सरसकट कर्ज मुक्त करावे, अशी मागणी ठाकरेंनी केली.
Make farmers debt-free, Uddhav Thackeray demands with folded hands from Chief Minister Devendra Fadnavis
महत्वाच्या बातम्या
- Dhananjay Munde : मुंडे म्हणाले तसं, बंजारा आणि वंजारी एकच आहेत का?
- Jan Arogya Yojana : जनआरोग्य योजनेत आता २,३९९ आजारांवर उपचार, मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीत निर्णय
- Nana Patole : महाराष्ट्र कर्जबाजारी, सरकारने श्वेतपत्रिका काढण्याची नाना पटाेले यांची मागणी
- एनकाउन्टरच्या भीतीने बंडू आंदेकरचा मुलगा कृष्णा पाेलीसांना शरण!