पोलिसांवर खोटे आरोप करताय.. सावधान, समाज माध्यमांत खोटी माहिती पसरवून पोलीस दलाची प्रतिमा मलीन करणाऱ्यावर गुन्हा

पोलिसांवर खोटे आरोप करताय.. सावधान, समाज माध्यमांत खोटी माहिती पसरवून पोलीस दलाची प्रतिमा मलीन करणाऱ्यावर गुन्हा

police

विशेष प्रतिनिधी

पुणे: पोलिसांवर खोटे आरोप करण्याची सवय असणाऱ्यांना आता सावध राहावे लागणार आहे. पोलीस (Police) दलाची प्रतिमा बदनाम मलिन करणाऱ्यांवर आता कडक कारवाई होऊ लागली आहे.

पुण्यात घडलेल्या प्रकारात खोटे गुन्हे दाखल करण्यात आले असल्याचा कांगावा करून तसेच त्याबद्दल समाज माध्यमांत खोटी माहिती पसरवली. तसेच लोकांना जमा करून त्यांच्या खोट्या सह्या घेऊन याबाबत निवेदन तयार करणाऱ्याविरुद्ध पोलीस दलाची प्रतिमा मलीन केल्याप्रकरणी खडक पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात याला आहे. (

ललित सत्यवान ससाणे (रा. भवानी पेठ आणि धनकवडी) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. याबाबत खडक पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांनी फिर्याद दिली आहे.

ससाणे याने ८ जून रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास लोहियानगर परिसरात लोकांचा जमा केले. पोलीस दलाची प्रतिमा व्हावी यासाठी लोकांसमोर आपल्याविरुद्ध पोलिसांनी खोटे गुन्हे दाखल केले असल्याचा कांगावा केला. त्यानंतर जमलेल्या लोकांच्या खोट्या सह्या घेऊन याबाबत एक निवेदन तयार केले.



फिर्यादी यांनी त्याच्यावर खोटे गुन्हे दाखल केले आहे अशी खोटी माहिती आरोपीने वारंवार समाज माध्यमात टाकली. अशी माहिती टाकून आरोपीने नागरिकांच्या मनात गैरसमज निर्माण करण्याचा तसेच त्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. त्यासोबतच आरोपीने पोलीस दलात अस्वस्थता निर्माण करणारी माहिती पसरवली.

फिर्यादी यांना त्यांच्या कर्तव्यापासून परावृत्त करण्यासाठी आणि त्यांच्यावर दडपण आणण्यासाठी आरोपीने ‘फिर्यादी त्याचा पाठलाग करीत आहेत’ अशी खोटी माहिती ११२ डायल प्रणालीला तसेच फिर्यादी यांच्या कनिष्ठ सहकाऱ्यांना दिली. दरम्यान, पोलिसांनी आरोपी ससाणे यांच्याविरुद्ध पोलीस दलाची प्रतिमा मलीन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.पोलीस निरीक्षक लोंढे तपास करीत आहेत.

https://youtu.be/Nv1DS0hpib4

Making false allegations against the police

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023