विशेष प्रतिनिधी
जालना : मराठ्यांच्या पोरांसाठी असे मनोज जरांगे पाटील सतत म्हणत असतात. काल तर त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर एकेरी भाषेत टीका करत पोलीस अधिकाऱ्यांना धमक्या दिल्या. मात्र जरांगे वाळू माफिया मेव्हण्याला तडीपार केल्यामुळे संतापले असल्याची टीका होत आहे. Manoj Jarange
जरांगेंच्या मेहुण्यासह सहा जणांना जालना प्रशासनानं तडीपार केलंय.जालन्यात वाळू माफिया आणि अट्टल गुन्हेगारांच्या विरोधात प्रशासन ॲक्शन मोडवर आलंय. वाळू प्रकरणासह इतर गुन्ह्यातील नऊ आरोपींना जालनासह बीड, परभणी आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यातून तडीपार करण्यात आलंय. या नऊ तडीपार आरोपींमध्ये मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या मेहुण्याचंही नाव आहे.
जरांगेच्या मेहुण्याची गुन्हेगारीची पूर्ण कुंडली समीर आली आहे. त्याचे पूर्ण नाव विलास हरिभाई खेडकर असे आहे. विलास खेडकरवर 2021 मध्ये अवैध वाळू वाहतूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. 2023 मध्ये जालन्यातील शहागड इथे बस जाळल्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे. 2023 मध्ये गोदावरी नदीतून 4 लाख 81 हजार रुपयांची वाळू चोरी प्रकरणी गुन्हा दाखल आहे 2023 मध्ये गोदावरी नदीतून 500 ब्रास वाळू चोरीप्रकरणातही त्याच्यावर गुन्हा दाखल केलेला अशा विविध गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर उपविभागीय न्यायदंडाधिकाऱ्यांनी विलास खेडकरवर कडक कारवाई केली. आता जालना, बीड, परभणीतून तडीपार केले.
जरांगे यांनी फडणवीस यांच्यावर टीका करताना म्हटले आहे की,केस मागे घेईल म्हणतो आणि तू तर केस उचकायला लागला. इथे काही अधिकारी आणलेत. त्याला नाव कमवायचे काही फार हाव लागली काय? हा सगळा संताप मनोज जरांगे पाटलांनी व्यक्त केला. त्याचे कारण मेहुण्यावर पोलिसांकडून झालेली तडीपारीची कारवाई आहे
Manoj Jarange got angry because of the action on Sand Mafia brothers-in-law,
महत्वाच्या बातम्या
- अंजली दमानिया यांच्यावर धनंजय मुंडे दाखल करणार फौजदारी अब्रुनुकसानीचा खटला
- पंतप्रधान नरेंद्र मोदी कुंभमेळ्यात, दिल्लीत आज मतदान
- Anjali Damania : अंजली दमानिया यांनी वाचला धनंजय मुंडेंच्या भ्रष्टाचाराचा पाढा, कृषीमंत्री असताना दुपटीहून दराने खरेदी
- Supriya Sule : पीकविमा योजनेतील भ्रष्टाचार प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई, खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रश्नावर केंद्रीय कृषिमंत्र्यांचे आश्वासन