विशेष प्रतिनिधी
बीड : आम्ही गेले पावणे दोन वर्षे आंदोलन केली. मात्र आता वेगळ्या मार्गाने मी आंदोलन करणार, असा इशारा देत मनोज जरांगे यांनी उपोषण सोडण्याचे संकेत दिले आहेत.
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांनी आक्रमक भूमिका घेत उपोषण सुरु केले होते. मनोज जरांगे पाटील यांनी शनिवारी २५ जानेवारी २०२५ पासून उपोषणाचे हत्यार उपसलं होतं. मनोज जरांगे हे सातव्यांदा उपोषणासाठी बसले होते. त्यांनी आंतरवाली सराटीत उपोषण सुरु केले होतं. गेल्या ५ दिवसांपासून मनोज जरांगे हे उपोषण करत आहेत.
मी आता उपोषण करणार नाही. पण आता झक पक आंदोलन करणार आहे. उद्या दुपारी 12 वाजता उपोषण सोडण्याबाबत मराठा समाजाशी बोलून निर्णय घेणार आहे. आज रात्री किंवा सकाळी मराठा समाजाशी बोलून उपोषण सोडणार” अशी मोठी घोषणा मनोज जरांगे पाटील यांनी केली.
Manoj Jarange will break his fast, warning of agitation in a different way
महत्वाच्या बातम्या