विशेष प्रतिनिधी
जालना : Manoj Jarange विधानसभा इच्छुक उमेदवारांशी उद्या सकाळी 9 ते 4 वाजेपर्यंत मी चर्चा करणार आहे. ज्या बांधवांनी अर्ज केले आहे, त्यांनी उद्या चर्चेसाठी यावे. पण उद्या चर्चेला आलेल्यांनी आपले तिकीट फायनल झाले असू समजू नये, असे मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. तर 20 ऑक्टोबरला मराठा समाजाची बैठक बोलावून अंतिम निर्णय घेणार, असे त्यांनी आज आंतरवाली सराटीमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत म्हटले आहे.
मनोज जरांगे पुढे बोलताना म्हणाले की, 20 तारखेच्या आंतरवालीमध्ये होणाऱ्या बैठकीमध्ये आपण समाजातील बांधवांना आपण उमेदवार पाडायचे का उभे करायचे याबद्दल विचारणा करणार आहोत आणि त्यानंतर निर्णय घेणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
कागदपत्रे तयार ठेवा
मनोज जरांगे म्हणाले की, 20 तारखेला जर लढायचे ठरले तर तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी 3 दिवस मिळतील त्यामळे निवडणुकीसाठी लागणारी कागदपत्रे सर्वांनी तयार ठेवावी. जर पाडायचा निर्णय झाला तर होऊन होऊन काय होईल की कागदपत्रासाठी केलेला खर्च वाया जाईल. लढायचे ठरो की पाडायचे ठरले तरी आपण सर्व जाती धर्मांच्या लोकांना न्याय देणार आहोत.
महायुतीने हीन वागणूक दिली
मनोज जरांगे पाटील म्हणाले की, मराठ्यांचे वाटोळे करुन तुम्हाला आम्ही पुढे जाऊ देणार नाही. मविआंच्या नेत्यांपेक्षा महायुतीने मराठा समाजाला हीन वागणूक दिली आहे. सत्ताधाऱ्यांचे मागे ओबीसी उभे नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच मराठा समाजाला आरक्षण देऊ शकतात, पण त्यांना कोण निर्णय घेऊ देत नाही हे समजत नाही, असे जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.
Manoj Jarange will decide on the 20th
महत्वाच्या बातम्या
- foreign exchange देशाच्या परकीय चलन गंगाजळीत 8 आठवड्यांत पहिल्यांदाच घट; 701 अब्ज डॉलरवर, गत आठवड्यात विक्रमी उच्चांक
- Noel Tata: नोएल टाटा यांची टाटा ट्रस्टच्या अध्यक्षपदी निवड; ट्रस्टने एकमताने घेतला निर्णय
- नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि नैना हे महाराष्ट्राला पॉवर हाऊस बनविणारे प्रकल्प – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे