विशेष प्रतिनिधी
धाराशिव : धाराशिव जिल्ह्यात खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्यातील कट्टर वैर सर्वश्रुत आहे. आता राणा जगजित सिंह यांच्या मुलाने ओमराजे यांना आव्हान दिले आहे. Omraje Nimbalkar
गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीदरम्यान धाराशिवमध्ये खासदार ओमराजे निंबाळकर आणि भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांचे पुत्र मल्हार पाटील आमने सामने आले. मल्हार पाटील हे आपल्या समर्थकांसह मिरवणुकीत सहभागी झाले होते. खासदार ओमराजे निंबाळकर हेही मिरवणुकीत सहभागी झाले होते. याच दरम्यान दोघांचे मार्ग एकत्र आले. मल्हार पाटील यांना त्यांच्या समर्थकांनी गराड्यात घेत, ओमराजे निंबाळकर यांना थेट दंड थोपटून आव्हान दिले.
घटनेच्या पार्श्वभूमीवर काही तरुणांनी “नादी नको लागू माझ्या, तुला चांगलाच रडविन… ढोलकीला बांधून तुला बदाबदा बडविन…” या गाण्यावर मल्हार पाटील यांचे रील्स सोशल मीडियावर पोस्ट केले. ही क्लिप मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाली आहे. हे गाणं ऐकत असतानाच खासदार ओमराजे निंबाळकर हे एकीकडे स्मित हास्य करत भाजप कार्यकर्त्यांकडे शांतपणे पाहताना या रीलमध्ये दिसत आहेत.
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तोंडावर असताना धाराशिवमध्ये राजकीय वातावरण तापले आहे. या निवडणुकीत खासदार ओमराजे आणि राणा जगजितसिंह यांच्यात पुन्हा सामना रंगणार आहे. लोकसभा निवडणुकीत खासदार ओमराजे यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून लढणाऱ्या राणा जगजित सिंह यांच्या पत्नीचा पराभव केला होता. विधानसभा निवडणुकीत दोन्ही गटांना संमिश्र यश मिळाले. त्यामुळे आता स्थानिक स्वराज्य संस्थांमधील सामना महत्वाचा ठरणार आहे.
खासदार ओमराजे निंबाळकर यांचे वडील पवनराजे हे राणा जगजितसिंह यांचे वडील आणि माजी मंत्री पद्मसिंह पाटील यांचे मावसभाऊ कुठे. मात्र त्यांच्या कुटुंबामध्ये मतभेद झाले. यातूनच पवनराजे निंबाळकर यांची हत्या झाली होती. त्याचा संशय पदमसिंह पाटील यांच्यावर घेण्यात आला होता. याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हाही दाखल करण्यात आलेला आहे.
त्यामुळे एका बाजूला भाजप आणि शिवसेना (उबाठा गट) यांच्यातील संघर्षाचे संकेत आणि दुसऱ्या बाजूला कुटुंबातील लढाई आहे.
MP Omraje Nimbalkar’s Son Warns Rana Jagjitsingh’s Son
महत्वाच्या बातम्या
- Laxman Hake : मराठा आरक्षण आंदोलनापुढे हतबल होऊन ओबीसींचे आरक्षण संपवले, लक्ष्मण हाके न्यायालयात दाद मागणार
- cabinet meeting : दिव्यांगांच्या अर्थसहाय्यात एक हजार रुपयांची वाढ, मेट्राेला गती : राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय
- Navnath Ban : राऊतांनी राहुल गांधींच्या अपयशी प्रयोगांचे कौतुक थांबवावे- नवनाथ बन
- Gunaratna Sadavarte : मुख्यमंत्री ब्राह्मण समाजाचे आहेत म्हणून त्यांना टार्गेट करू नका; सदावर्तेंचा इशारा