विशेष प्रतिनिधी
मुंबई: शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांची तब्येत अचानक बिघडल्यामुळे त्यांना मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले आहे. Sanjay Raut
खासदार संजय राऊत यांनी दरराेजप्रमाणे भांडूप येथील निवासस्थानी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरेही दिली. मात्र, त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने रुग्णालयात हलविण्यात आले. Sanjay Raut
काही दिवसांपूर्वी याच फोर्टिस हॉस्पिटलमध्ये त्यांच्या रक्त तपासण्या करून घेतल्या होत्या. प्रकृती बिघडल्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना रुग्णालयात ॲडमिट करण्यात आले आहे. राऊत यांच्या तब्येतीबद्दल सध्या अधिकृत माहिती समोर आलेली नाही. खासदार संजय राऊत यांना यापूर्वी हृदयविकाराचा त्रास झाला आहे आणि त्यांच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आल्या आहेत.
राऊत यांच्यावर नोव्हेंबर २०१९ मध्ये पहिल्यांदा अँजिओप्लास्टी करण्यात आली होती. त्यावेळी त्यांना छातीत हलका त्रास जाणवत होता. ही शस्त्रक्रिया लीलावती रुग्णालयात झाली होती आणि त्यांच्या हृदयात दोन ‘स्टेंट्स’ बसवण्यात आले होते.दुसरी अँजिओप्लास्टी: त्यानंतर डिसेंबर २०२० मध्ये त्यांच्यावर पुन्हा एकदा अँजिओप्लास्टीची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. यामध्ये आणखी ‘स्टेंट्स’ बसवण्यात आले होते, कारण आधी बसवलेल्या स्टेंट्सपैकी एकामध्ये पुन्हा ब्लॉकेज आढळला होता. ही शस्त्रक्रियासुद्धा लीलावती रुग्णालयात करण्यात आली होती.
पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणात सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) राऊत यांना अटक केली हाेती. त्यांना शंभरहून अधिक दिवस कारागृहात काढावे लागले हाेते. या काळात त्यांच्या प्रकृतीत बिघाड झाल्याचे सांगण्यात येते.
MP Sanjay Raut’s health deteriorates, admitted to hospital
महत्वाच्या बातम्या
- Cooperation Minister, : लोकांना कर्जमाफीचा नाद, सहकार मंत्र्यांच्या असंवेदनशील विधानावर संताप, म्हणण्याचा अर्थ ताे नव्हता असा खुलासा
- Nitesh Rane : एमआयएमच्या नावाखाली हिरव्या सापांची वळवळ, पुन्हा सभा हाेऊ द्यायची का विचार करू, नितेश राणेंचा इशारा
- Ajit Pawar : तुम्हाला पाठीशी घालायला आम्ही मोकळे नाही, गैरप्रकार करणाऱ्यांना अजित पवार यांचा इशारा
- महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन निवडणुकीत रंगणार ‘पवार विरुद्ध मोहोळ’ सामना