विशेष प्रतिनिधी
मुंबई : Mudhoji Bhosale मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण न देता मराठा म्हणून सरसकट स्वतंत्र आरक्षण द्यावे, अशी मागणी नागपूरचे राजे मुधोजी भोसले यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी मुंबईच्या आझाद मैदानावर 5 दिवस उपोषण केले. त्यांच्या या उपोषणाला यश आले व महायुती सरकारने आरक्षणाबाबतचा शासन निर्णय घेतला. त्यानुसार हैदराबाद गॅझेटची अंमलबजावणी करण्याचे सरकारने मान्य केले. आता यावर नागपूरचे राजे मुधोजी भोसले यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण न देता मराठा म्हणून सरसकट आरक्षण द्यावे, अशी मागणी केली आहे. याबाबत त्यांनी मागणीचे पत्र देखील देवेंद्र फडणवीस यांना दिले आहे. Mudhoji Bhosale
मराठा आरक्षणाच्या संदर्भात मुंबईच्या आझाद मैदानावर मनोज जरांगे पाटील यांनी नुकतेच आंदोलन केले. यामध्ये मराठ्यांना काय मिळाले? असा सवाल मुधोजी भोसले यांनी पत्रातून केला आहे. मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला माझा पाठिंबा आहे. पण, त्यांनी जी मागणी केली की मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण द्या, या मागणीतून मराठ्यांना काय सध्या झाले? असा प्रश्न भोसले यांनी उपस्थित केला आहे. Mudhoji Bhosale
मराठवाड्याच्या काही जिल्ह्यात 58 लाख कुणबी नोंदी सापडल्या आहेत. त्यात अर्थातच काही त्रुटी आहेत. परंतु, ज्यांच्या नोंदी आहेत, त्यांना नक्कीच लाभ मिळावा. कागदपत्रांची पूर्तता करण्यात या लभाचा टक्का निश्चितच घसरणार आहे यात शंका नाही. अशात उर्वरित अंदाजे 2.50 कोटी मराठ्यांचे काय आहे? आस प्रश्न राजे मुधोजी यांनी विचारला आहे.
मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने माझे व्यक्तिगत मत आहे की, मराठ्यांना मराठा म्हणूनच सरसकट आरक्षण मिळावे, जेणेकरुन हा पेच निर्माण होणार नाही. संपूर्ण महाराष्ट्रातील मराठ्यांना मराठा म्हणूनच मराठा आरक्षणाचा फायदा होईल. मराठ्यांना मराठा म्हणूनच सरसकट आरक्षण द्यावे, जेणेकरुन 58 लाख कुणबी नोंदीवाले मराठे अधिक उर्वरीत 2.50 कोटी मराठ्यांना मराठा आरक्षणाचा फायदा होईल, असे राजे मुधोजी भोसले यांनी त्यांच्या पत्रात म्हटले आहे.
Mudhoji Bhosale demands separate reservation for Maratha community, not OBCs
महत्वाच्या बातम्या
- Laxman Hake : मराठा आरक्षण आंदोलनापुढे हतबल होऊन ओबीसींचे आरक्षण संपवले, लक्ष्मण हाके न्यायालयात दाद मागणार
- cabinet meeting : दिव्यांगांच्या अर्थसहाय्यात एक हजार रुपयांची वाढ, मेट्राेला गती : राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय
- Navnath Ban : राऊतांनी राहुल गांधींच्या अपयशी प्रयोगांचे कौतुक थांबवावे- नवनाथ बन
- Gunaratna Sadavarte : मुख्यमंत्री ब्राह्मण समाजाचे आहेत म्हणून त्यांना टार्गेट करू नका; सदावर्तेंचा इशारा