विशेष प्रतिनिधी
मुंबई : पाकिस्तानी झेंडा लावणे, बॉम्बस्फोटमधील आरोपीसोबत प्रचार ही ‘खान’ प्रवृत्तीची ओळख आहे. त्यामुळे या मुंबईला ‘खान’ महापौर नको, ही आमची भूमिका आहे.” असा इशारा भारतीय जनता पक्षाचे मुंबई शहर अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी दिला. Amit Satam
मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांनी मुंबईतील एका कार्यक्रमात शिवसेना उद्धव बाळसाहेब ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. जे स्वतःला पर्यावरणवादी समजतात त्यांनी एसटीपी प्लांट का केला नाही? असा सवाल करत त्यांनी आदित्य ठाकरेंना बालबुद्धी असे संबोधले आहे. तसेच यावेळी त्यांनी शिवसेना ठाकरे गट आणि मनसेवर हल्लबोल केला. Amit Satam
भाजपचे मुंबईचे अध्यक्ष अमित साटम म्हणाले की, “जे स्वतःला पर्यावरणवादी समजतात त्यांनी सांडपाणी प्रक्रिया संयंत्र प्लांट का केला नाही? महानगरपालिकेमध्ये एवढे पैसे आहेत, आंतरराष्ट्रीय शहर आहे तरीदेखील एसटीपी प्लांट नाही. रस्ते धुवून काढण्यासाठी त्यांनी बजेट द्यायला पाहिजे, मुंबईतील हवा चांगली आहे. बालबुद्धी असल्यामुळे आरे कारशेडला विरोध झाला. तसेच काही लोक स्वतःला युवा नेते म्हणून घेतात, पण या युवा नेत्यांनी युवांसाठी काहीच केले नाही.” असे म्हणत टोला लगावला.
मराठी भाषेच्या मुद्द्यावरून अमित साटम यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली. “मराठी टक्का आज मुंबईमध्ये 35 टक्के आहे. आधी फक्त मराठी माणसाच्या गप्पा होत होत्या, आता काम होत आहेत. बीडीडी चाळीचे संपूर्ण काम देवेंद्र फडणवीस यांनी केले, पण काही लोक निवडणुकीनंतर मराठी माणसांचा फक्त वापर करतात. आम्ही मराठी तरुणांना नोकऱ्या आणि स्टार्टअप्ससाठी प्रोत्साहन देत आहोत, पण काही लोक फक्त मराठी माणसांचा आणि तरुणांचा राजकारणासाठी फायदा घेत आहेत,” असे म्हणत त्यांनी टीका केली.
“तुम्ही तुमच्या मुलांना बॉम्बे स्कॉटिश शाळेत टाकले, तुमची मुले जर्मन आणि इंग्लिश शिकली. मग, तुमचा हिंदीला विरोध का? ही दुटप्पी भूमिका का घेता? तसेच, ‘खान’ प्रवृत्तीवर टीका करताना त्यांनी स्पष्ट केले की, पाकिस्तानी झेंडा लावणे, बॉम्बस्फोटमधील आरोपीसोबत प्रचार ही ‘खान’ प्रवृत्तीची ओळख आहे. त्यामुळे या मुंबईला ‘खान’ महापौर नको, ही आमची भूमिका आहे.” असे म्हणत हिंदी भाषेच्या मुद्द्यावरून अमित साटम यांनी ठाकरे बंधूंवर टीका केली.
Mumbai doesn’t want a ‘Khan’ mayor, this is our stance, Amit Satam takes a dig at Thackeray
महत्वाच्या बातम्या
- Devendra Fadnavis गतिमान आणि प्रगतीशील कायदा-सुव्यवस्था उभी करणार! अमित शहा यांच्यासोबत देवेंद्र फडणवीस यांची बैठक
- Russia : ”रशियाने युक्रेनमधील चेर्नोबिल पॉवर प्लांटवर हल्ला केला”
- PM Modi : पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यामुळे भारत-अमेरिका व्यापार संबंध अधिक मजबूत
- Manipur : मणिपूरमधील कॅम्पमध्ये सीआरपीएफ जवानाने केला गोळीबार अन् नंतर…



















