विशेष प्रतिनिधी
पुणे : नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीचा निकाल ३ डिसेंबरला लागल्यानंतर लगेचच राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन ८ ते १९ डिसेंबरदरम्यान होणार आहे. या कालावधीत कोणत्याही नव्या निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता नाही. त्यामुळे महापालिका निवडणुका आणखी लांबणीवर जाण्याची शक्यता आहे.
नगरपालिका आणि नगरपंचायतींसाठी २ डिसेंबरला मतदान, तर मतमोजणी ३ डिसेंबरला होणार आहे. या निवडणुकीनंतर राज्य प्रशासनाचे लक्ष हिवाळी अधिवेशनाकडे वळणार आहे. अधिवेशन संपेपर्यंत निवडणुकीसंबंधी कोणतीही घोषणा होऊ शकत नाही, असा परिपाठ आहे. त्यामुळे महापालिका, तसेच जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका आता अधिवेशनानंतर म्हणजेच १९ डिसेंबरनंतरच घोषित होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व निवडणुका ३१ जानेवारी २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. त्या पार्श्वभूमीवर आयोगावर वेळेत प्रक्रिया पूर्ण करण्याचा दबाव आहे. तथापि, अधिवेशन, कर्मचारी यंत्रणेवरील ताण आणि विविध निवडणूक कार्यक्रमांच्या आच्छादनामुळे आयोगाकडून सर्वोच्च न्यायालयाकडे मुदतवाढ मागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
राज्यातील १४ महापालिका, २५० हून अधिक नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुका रखडलेल्या आहेत. स्थानिक पातळीवरील सत्तांतर आणि राजकीय समीकरणांमुळे या निवडणुकांकडे राज्याचे राजकारण मोठ्या उत्सुकतेने पाहत आहे. मात्र, आता अधिवेशनामुळे महापालिका निवडणुकीचा बिगुल काहीसा थांबण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
Municipal elections postponed again! Schedule disrupted due to convention
महत्वाच्या बातम्या
- पिंपरखेड येथे बिबट्याच्या हल्यात मुलाचा मृत्यु, संप्तप्त जमावाने वन विभागाची गाडी जाळली
- चक दे इंडिया : भारताने महिला एकदिवसीय विश्वचषक जिंकत रचला इतिहास:दक्षिण आफ्रिकेला 52 धावांनी हरवून चॅम्पियन
- पुणे पोलीस आयुक्तालयात तोतया आयपीएस अधिकारी पोलिसांच्या ताब्यात!
- शिवसेनेला कमी लेखलं तर शांत बसणार नाही, शंभूराज देसाई यांचा इशारा



















