विशेष प्रतिनिधी
पुणे : माझ्या शहरातली कायदा आणि सुव्यवस्था मी बिघडू देणार नाही. त्याबाबत पोलिसांना सूचना केल्या आहेत, अशी माहिती केंद्रीय राज्य मंत्रीमुरलीधर मोहोळ यांनी दिली.
मोहोळ म्हणाले, स्वारगेट बस स्थानकात बलात्कार झाल्याची बातमीसमजली. त्यानंतर मी पोलीस आयुक्तांना फोन केला आणि लवकरात लवकर अटक करा अशा सूचना केल्या. या शहरातली कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी आम्ही पोलिसांसोबत आहोत
मुख्यात गुंड गजा मारणे टोळीवर लावलेल्या मोका संदर्भात ते म्हणाले, ही कारवाई फक्त एका केस पुरती मर्यादित नाही. प्रत्येक पुणेकर हा माझा आहे त्यामुळे कोणत्याही पुणेकरांना अशा प्रकारच्या अडचणींना सामोरे जावं लागत असेल तर पोलिसांनी अशीच कारवाई करावी. केवळ देवेंद्र जोग नाही तर त्याच्या जागी कोणीही असतात तरी हीच भूमिका आमची राहिली असती. तो कार्यकर्ता आहे म्हणून स्वाभाविक आहे. पण कार्यकर्ता नसता तरी आमची हीच भूमिका असती.
दरम्यान, मंगळवारी पहाटे स्वारगेट एसटी स्टॅडवर उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये एका 26 वर्षीय तरूणीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना घडली आहे. आरोपीने गोड-गोड बोलून पीडित तरूणीला आपल्या जाळ्यात ओढले आणि नंतर बसमध्ये गेल्यावर तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. या घटनेनंतर सध्या आरोपी फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. यावर मोहोळ यांनी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याशी संपर्क साधून तात्यांनी तपास करण्याच्या सूचना दिल्या.
Muralidhar Mohol’s instruction to the police
महत्वाच्या बातम्या
- Sanjay Nirupam : एसआरए प्रकल्पांमध्ये हिंदू कमी करून हाऊसिंग जिहाद, संजय निरुपम यांचा आरोप
- धक्कापुरुष कायमचा घरी बसविला , एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरे यांच्यावर टीका
- Raj Thackeray मराठी भाषा गौरव दिनी मनसेचे पुस्तक प्रदर्शन, राज ठाकरेही आवडीची कविता सादर करणार
- Sharad Pawar शरद पवार यांनी सांगितलं आपल्या पंतप्रधानपदाचा किस्सा, नाव शॉर्टलिस्ट पण…