Jitendra Awhad नामदेव शास्त्री किमान गादीचा मान राखा, जितेंद्र आव्हाड यांनी सुनावले

Jitendra Awhad नामदेव शास्त्री किमान गादीचा मान राखा, जितेंद्र आव्हाड यांनी सुनावले

विशेष प्रतिनिधी

मुंबई : Jitendra Awhad  भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी मंत्री धनंजय मुंडे यांना क्लीन चिट देत संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांच्या मानसिकतेचा विचार करा, असे विधान केल्याने त्यांच्यावर टिकेचा भडीमार होऊ लागला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी तर किमान गादीचा मान राखा असे आवाहन नामदेव शास्त्री यांना केले आहे.

पत्रकारांशी बोलताना आव्हाड म्हणाले,आपण ज्या गादीचा वारसा चालवित आहेत, तिला थोर परंपरा आहे. त्याचा तरी त्यांना मान राखावा अशी अपेक्षा आहे.संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांच्या मानसिकतेचा विचार करा असे ते म्हणत आहेत. मग संतोष देखमुख यांची मुलं, ज्यांना आपल्या बापाचा चेहरा रोज दिसत आहे त्यांच्या मानसिकतेचा कोण विचार करणार?

भारताच्या आर्थिक इतिहासातील मैलाचा दगड, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले अर्थसंकल्पाचे कौतुक

आव्हाड म्हणाले, या प्रकरणात आधी वॉचमन अशोक सोनवणे यांचा खून झाला होता. त्याचा सुद्धा खून करण्याची गरज काय होती का? संतानी द्वेषापलिकडे जाऊन सर्वांना एकाच न्यायाने पाहिले पाहीजे. जर अशा प्रकारे आपण जर बदला घेऊ लागलो तर कायदा राहणार नाही. ‘डोळ्यांचा बदल्यात डोळा’ हा न्याय जर लावला तर गांधींच्या विचारांप्रमाणे संपूर्ण जग अंध होईल असेही जितेंद्र आव्हा़ड यावेळी म्हणाले. त्याच बीडमध्ये रामकृष्ण बांगर यांना खोट्या केसेमध्ये धनंजय मुंडे आणि कराड याने अडकवले आहे. पायात नेम थरून आरोपीनी गोळ्या घातली अशी केस एका म्हातारीवर बनविली आहे. मुळात म्हातारी व्यक्ती बंदूकीचा चाफ ओढू शकते का? ते झटका तिला सहन होईल का? आपण रोज पोलिसांशी या केसवर बोलत आहोत. पोलिस मला उत्तर देत आहेत की केस आज मागे घेतो उद्या मागे घेतो.

महंत म्हणतात की पंकजा मुंडे माझ्याकडे आल्या नव्हत्या म्हणून मी त्यांची बाजू घेतली नाही. कराड हा आरोपी आहे. तर धनंजय मुंडे हे मंत्री असल्याने आपण त्यांची बाजू घेतली असे त्यांचे म्हणणे आहे. संतांनी शेवटच्या माणसाचे ऐकले पाहीजे. मूळात ते ज्या गादीचा वारसा चालवित आहेत तिला मोठी परंपरा आहे. भगवान गडची जागा एका कासार समाजातील व्यक्तीची आहे. त्यानंतर भीमसेन महाराज आले, ते राजपूत समाजाचे होते. ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे अनुयायी होते.

बाबासाहेबांच्या मनमाड परिषदेत संत भीमसेन गुरुजी सामील झाले होते. त्यांना कुणाला त्या जागेवर बसवायच होतं आणि तिथे कोण मोटार सायकलवर येऊन बसलं हे सगळ्याना माहिती आहे. संत तुकाराम यांची कधी जात चर्चेत आली नाही. त्यांना अख्या महाराष्ट्राने संत पदी नेले होते. या गादीचा मान राखायला हवा. आता धनंजय मुंडे आधुनिक तुकाराम महाराज होऊ शकतात असा टोलाही जितेंद्र आव्हाड यांनी लगावला.

Namdev Shastri at least respect the throne, narrated by Jitendra Awhad

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023