विशेष प्रतिनिधी
मुंबई : ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानला डिवचणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या नेत्या आणि माजी खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांना पाकिस्तानमधून वेगवेगळ्या फोनवरून जीवे मारण्याच्या धमक्या आल्या आहेत. नवनीत राणा यांनी मुंबईच्या खार पोलिसांना माहिती दिली आहे. नवनीत राणा यांना यापूर्वीही पाकिस्तानमधून धमकीचे मेसेज आले आहे.
नवनीत राणा यांना आलेल्या धमकीच्या संदेशात म्हटले आहे की, ‘हिंदू शेरनी हनुमान चालीसा पढने वाली थोडे दिन की मेहमान है. जल्दी उडने वाली है.’ पाकिस्तानातील वेगवेगळ्या फोनवरून या धमक्या नवनीत राणा यांना आल्या आहे. त्यानंतर राणा यांच्याकडून ही माहिती पोलिसांना दिली आहे. पोलिसांनी तपासही सुरु केला आहे.
दोन दिवसांपूर्वी नवनीत राणा यांनी ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्ताचे झालेल्या नुकसानबाबत डिवचले होते. त्यांनी दिलेल्या वक्तव्यात म्हटले होती की, ‘घर मे घुसकर मारा है, कबर तुम्हारी खोदी है. देश की गद्दी दिल्ली पर बाप तुम्हारा मोदी बैठा है…क्या बोलते छोटे पाकिस्तान, बकरी की अम्मा कब तक खैर मनायेगी. चुन चुन कर मारेंगे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मी धन्यवाद आणि अभिनंदन करते. घर मे घुसके मारेंगे, हे काय असते, हे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दाखवून दिले आहे. या पार्शवभूमीवर ही धमकी आली असल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
मागील वर्षी नवनीत राणा यांना पाकिस्तानमधून धमकी आली होती. त्यांच्या व्हॉटसअॅप क्रमांकावर क्लिप पाठवून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधून ही धमकी आली आहे. आता पुन्हा राणा यांना धमकी आल्यामुळे पोलीस यंत्रणा कामाला लागली आहे.
Navneet Rana receives death threats from Pakistan
महत्वाच्या बातम्या
- Harshvardhan Sapkal : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन्ही गट एकत्र आले तर आक्षेप नाही; हर्षवर्धन सपकाळ यांची भूमिका
- Sophia Qureshi : बेजबाबदार पाकिस्तान, भारतावर हल्ला करत असतानाही सुरू ठेवली नागरी विमानसेवा, कर्नल सोफिया कुरेशी यांची माहिती
- Rashtriya Swayamsevak Sangh : देशविरोधी षड्यंत्रांना यश मिळू देऊ नका! राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे देशवासीयांना आवाहन
- IPL 2025 Postponed : भारत-पाकिस्तान तणावाचा आयपीएलला फटका, स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित