Nilesh Ghaywal : निलेश घायवळवर आंतरराष्ट्रीय गुन्हेगार म्हणून कारवाई; पुणे पोलिसांचा मोठे पाऊल, इंटरपोलकडून ‘ब्लू कॉर्नर’ नोटीस जारी

Nilesh Ghaywal : निलेश घायवळवर आंतरराष्ट्रीय गुन्हेगार म्हणून कारवाई; पुणे पोलिसांचा मोठे पाऊल, इंटरपोलकडून ‘ब्लू कॉर्नर’ नोटीस जारी

Nilesh Ghaywal

विशेष प्रतिनिधी

पुणे :Nilesh Ghaywal पुण्यातील कोंथरूडमध्ये झालेल्या गोळीबार प्रकरणात मुख्य आरोपी असलेल्या निलेश घायवळविरुद्ध (Nilesh Ghaywal) पुणे पोलिसांनी आता आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठी कारवाई केली आहे. निलेश घायवळ हा सध्या देशाबाहेर फरार असून, त्याच्या शोधासाठी पुणे पोलिसांनी इंटरपोलकडे पत्र पाठवले होते. या मागणीची दखल घेत इंटरपोलने आता निलेश घायवळविरुद्ध ‘ब्लू कॉर्नर’ (blue corner notice) नोटीस जारी केली आहे.



निलेश घायवळ (Nilesh Ghaywal) टोळीविरोधात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (MCOCA) अंतर्गत कारवाई करण्यात आली असून, टोळीतील दहा सदस्यांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मात्र टोळीचा प्रमुख असलेला निलेश घायवळ हा पोलिस कारवाईपूर्वीच देशाबाहेर पळून गेला आहे.

पुणे पोलिसांनी इंटरपोलकडे अधिकृतपणे पत्र पाठवून घायवळविरुद्ध कारवाईची मागणी केली होती. त्या पत्राला प्रतिसाद देत इंटरपोलने ‘ब्लू कॉर्नर’ नोटीस जारी केली आहे. ही नोटीस म्हणजे संशयित गुन्हेगाराच्या ओळखीची, ठिकाणाची व इतर माहिती मिळवण्यासाठी जगभरातील पोलिस यंत्रणांना दिलेला सिग्नल असतो. त्यामुळे आता निलेश घायवळचा शोध आंतरराष्ट्रीय स्तरावर घेतला जाईल.Nilesh Ghaywal

यापूर्वी पुणे पोलिसांनी कोथरूड येथील निलेश घायवळच्या घरावर धाड टाकली होती. या कारवाईदरम्यान मोठ्या प्रमाणात मौल्यवान वस्तू, रोख रक्कम, तसेच दोन जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात आली. याशिवाय अनेक भूखंडांचे बेकायदेशीर दस्तऐवज देखील पोलिसांच्या हाती लागले आहेत.

http://youtube.com/post/UgkxxCPPEX1Q-rPJi5QXqkqekf4u92PYas7d?si=WAINPgCid_1TBomj

पोलिस आता घायवळला सर्व बाजूंनी कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत आहेत. देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवरूनही त्याचा शोध घेतला जात आहे. पुणे पोलिसांचा उद्देश स्पष्ट आहे – निलेश घायवळला भारतात परत आणून कायदेशीर कारवाई करणे.

ब्लू कॉर्नर नोटीस ही इंटरपोलकडून जारी केली जाणारी एक प्रकारची विनंती असते, जी संबंधित देशांच्या पोलिस यंत्रणांना संशयित व्यक्तीच्या ओळखीची, वास्तव्याची किंवा हालचालींची माहिती मिळवण्यासाठी मदत करते. याच्या आधारावर पुढील कायदेशीर पावले उचलली जातात.

निलेश घायवळ ही टोळी पुणे शहरात अनेक वर्षांपासून सक्रिय असून खंडणी, जमिनीचे वाद, दहशत माजवणे अशा स्वरूपाचे गंभीर गुन्हे या टोळीविरुद्ध नोंदवले गेले आहेत.

Nilesh Ghaywal Declared an International Criminal; Major Action by Pune Police, ‘Blue Corner’ Notice Issued by Interpol

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023