विशेष प्रतिनिधी
मुंबई : मुंबईत न्यू इंडिया बँक ज्याप्रकारे लुटली गेली त्यात सर्व भाजपाचे लोक आहेत. आमदार राम कदम यांचा सहभाग आहे, आता कुठे गेले मुलुंडचे पोपटलाल? शेकडो कोटींना बँक लुटली गेली. आता का बोलत नाहीत? भाजपाच्या लोकांनी बँक लुटली म्हणून बोलत नाही?” असा सवाल शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
राऊत म्हणाले, जॉर्ज फर्नांडिस यांनी स्थापन केलेली ही बँक आहे. आता ते किरीट सोमय्या ईडीकडे जात नाहीत. आता का पत्रकार परिषद घेत नाहीत? भाजपाचे आमदार त्यात अडकले आहेत. भाजपा आमदाराच्या दबावाखाली कर्जे वाटली गेली.
भाजपाच्या गृहमंत्र्यांनी, देवेंद्र फडणवीसांनी यावर उत्तर दिलं पाहिजे. काय गुन्हे दाखल करत आहात तुम्ही? ज्यांना पैसे मिळाले आहेत ते सर्व सर्व बिल्डर भाजपाशी, आरएसएस संबंधित आहेत. ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे. या देशात विरोधी पक्षातील लोकांना एक न्याय आणि सत्ताधाऱ्यांना एक न्याय आहे, कोणता समान नागरी कायदा आणताय तुम्ही?”
Nilesh Rane : उद्धव ठाकरे यांची पक्ष सांभाळायची कुवत नाही, निलेश राणे यांची टीका
मुंबईतील अनेक सामान्य माणसांचे पैसे अडकून पडलेल्या न्यू इंडिया को ऑपरेटिव्ह बँक घोटाळ्यात भाजप आमदार राम कदम यांचा सहभाग असल्याचा आरोप करण्यात आला आला होता. राम कदम यांनी न्यू इंडिया को ऑपरेटिव्ह बँकेचा मॅनेजर हितेश मेहता याच्यावर दबाव टाकून त्याला नियमबाह्य पद्धतीने कर्ज द्यायला भाग पाडले. ही कर्जे भाजपशी संबंधित असलेल्या लोकांना देण्यात आली. या कर्जांची कधीही परतफेड करण्यात आली नाही.
तसेच राम कदम यांनी न्यू इंडिया को ऑपरेटिव्ह बँकेच्या शाखांसाठी स्वत:च्या मालकीचे चेंबूर, घाटकोपर आणि मुंबई उपनगरातील गाळे अव्वाच्या सव्वा दराने भाड्याने दिले. या सगळ्यामुळे बँक डबघाईला आली, असा आरोप करण्यात येत आहे.