विशेष प्रतिनिधी
जालना : Manoj Jarange ओबीसी समाजाला एक दुष्ट विचारांचा नेता मिळाला आहे, जो आपल्या स्वार्थासाठी इतरांना वेगळे आमिष दाखवून कामाला लावतो, असा हल्लाबोल मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्यावर हल्लाबोल केला आहे.Manoj Jarange
मंत्री छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषद घेत आज पुन्हा एकदा सरकारच्या शासन निर्णयावर तसेच मराठा आरक्षणावर टीका केली आहे. त्याला जोरदार प्रत्युत्तर देताना मनोज जरांगे पाटील म्हणाले, भुजबळ यांना सर्व काही आपल्या मनाप्रमाणे चालले पाहिजे असे वाटते. मात्र, आपण सर्व लोकशाही मार्गाने आपले हक्क मिळवणार आहोत, असे जरांगे पाटील यांनी ठामपणे सांगितले. तुला जे काही करायचे आहे ते कर, आम्ही आमच्या मार्गाने ओबीसी आरक्षणात आमचे स्थान मिळवूनच राहू, असे आम्ही आधीपासूनच कुणबी आणि ओबीसीच्या यादीत समाविष्ट आहोत.Manoj Jarange
मराठा समाज पुढारलेला आहे, तो मागस नाही असे भुजबळ म्हणाले होते. त्यावर जरांगे म्हणाले की, तू काय कमी पुढारलेला आहेस का? तुझ्या प्रत्येक गावात जमिनी आहेत. भुजबळांनी गोरगरीब ओबीसींना वेड्यात काढले आहे. तुला रस्त्यावर उतरु नको केव्हा म्हटले, तुला जिंदगीत दुसरे काय आले? सरकारने भुजबळांवर गुन्हा दाखल केला पाहिजे, तू म्हणजे मंत्रिमंडळ आहे का?
लावण्यासाठी मोर्चे काढण्यासाठी हा कुटाने करतो. ओबीसींनी शहाणे व्हावे, याच्या नादी लागून ओबीसींचे वाटोळे करू नये. त्यांना जर आम्हाला चॅलेंज केले तर 1994 चा जीआर आम्ही चॅलेंज करणार आहे. आम्ही म्हटले का ओबीसी महामंडळाला महाज्योती का दिले म्हणून? तुमच्यासारखा मी जातीवादी नाही. तुम्ही उपसमिती बोलावली त्यात एकही मराठा नाही. सरळ सरळ जातीवाद आहे हे तुम्हाला दिसले का? असेही जरांगे म्हणाले.
छगन भुजबळ पत्रकार परिषद घेत म्हणाले होते की, मराठा म्हणून सुद्धा आणि कुणबी म्हणून सुद्धा हा समाज ओबीसीमध्ये येऊ शकत नाही. तीन आयोगांनी देखील हा मुद्दा फेटाळून लावला आहे. काका कालेलकर आयोगाने देखील 1955 सालीच सांगितले होते की मराठा समाजाला मागास प्रवर्गात घेता येणार नाही, त्यांना मागास म्हणता येणार नाही. मराठा समाजाचे मुख्यमंत्री झाले काही केंद्रात गेले, त्यांनी सुद्धा मराठा समाजाला मागास ठरवले नाही.
छगन भुजबळ म्हणाले की, मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आदर करतो. त्यांचा हेतू चांगला असेल, त्यांचा अभ्यास आहे. पण ज्या पद्धतीने ड्राफ्टिंग झाले आहे. त्या बाबतीत आम्ही अभ्यासकांशी बोललो आहोत. ते बोलले हे अडचणीचे झालेले आहे. पहिल्या जीआरमध्ये मराठा समाजाच्या पात्र व्यक्तींना कुणबी प्रमाणपत्र द्या, असा उल्लेख होता. जरांगे यांनी नंतर त्यांना सांगितले आणि पात्र हा शब्द काढला. यावरुन काय समजायचे? पुढे असे म्हटले की, नातेवाईक आणि नातेसंबंध यात फरक आहे. नाते सबंध म्हणजे काय?
OBC Community Targeted by Leader of Evil Ideologies, Manoj Jarange
महत्वाच्या बातम्या
- Laxman Hake : मराठा आरक्षण आंदोलनापुढे हतबल होऊन ओबीसींचे आरक्षण संपवले, लक्ष्मण हाके न्यायालयात दाद मागणार
- cabinet meeting : दिव्यांगांच्या अर्थसहाय्यात एक हजार रुपयांची वाढ, मेट्राेला गती : राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय
- Navnath Ban : राऊतांनी राहुल गांधींच्या अपयशी प्रयोगांचे कौतुक थांबवावे- नवनाथ बन
- Gunaratna Sadavarte : मुख्यमंत्री ब्राह्मण समाजाचे आहेत म्हणून त्यांना टार्गेट करू नका; सदावर्तेंचा इशारा