विशेष प्रतिनिधी
मुंबई : Hyderabad Gazette मराठा समाजाला कुणबी दर्जा देण्याच्या हैदराबाद गॅझेटीयरच्या अंमलबजावणीशी संबंधित 2 सप्टेंबरच्या सरकारी जीआरला आव्हान देणाऱ्या याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आल्या आहेत. मराठा, कुणबी एक नाहीत. Hyderabad Gazette
पुरेशा माहितीअभावी राजकीयदृष्टय़ा प्रबळ आणि प्रगत मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून दाखले देण्याचा सरकारचा निर्णय मनमानीकारक असून, संविधानाचे उल्लंघन करणारा आहे. त्यामुळे सरकारी जीआर रद्द करण्यात यावा, अशी मुख्य मागणी याचिकेद्वारे करण्यात आली आहे.
आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या आंदोलनाचा धसका घेत राज्य सरकारने मराठय़ांना हैदराबाद गॅझेटमधील नोंदीच्या आधारे ओबीसी प्रवर्गातून दाखले देण्याचा निर्णय घेतला. याबाबत 2 सप्टेंबर रोजी शासन निर्णय (जीआर) काढण्यात आला. मात्र हा शासन निर्णय कायद्याला धरून नाही, असा दावा करत वकील विनित धोत्रे यांनी अॅड. राजेश खोब्रागडे यांच्यामार्फत याविरोधात हायकोर्टात याचिका दाखल केली. जीआरमध्ये पुरेशा माहितीशिवाय सामाजिकदृष्टय़ा प्रगत मराठा समाजाला मनमानीपणे ओबीसी दर्जा देण्यात आला असून यामुळे संविधानाच्या कलम 14 चे उल्लंघन झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. ओबीसी आरक्षणातील त्यांचा वाटा कमी करून भेदभाव करत असल्याचा आरोपही याचिकेत करण्यात आला आहे. Hyderabad Gazette
शिवा अखिल भारतीय वीरशैव युवक संघटनेनेही अॅड. सतीश तळेकर यांच्यामार्फत जनहित याचिका दाखल केली आहे. राज्य मागासवर्ग आयोग आणि राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाच्या असंख्य अहवाल आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निकालांनुसार मराठा आणि कुणबी हे एक नाहीत, असे सांगूनही सरकार पुन्हा मराठा आणि कुणबी एकच आहेत असा प्रचार करत आहे, असा आरोप करण्यात आला आहे. या दोन्ही याचिकांवर हायकोर्टात लवकरच सुनावणीची शक्यता आहे. Hyderabad Gazette
Petition Filed in High Court Against Hyderabad Gazette Granting Kunbi Status to Maratha Community
महत्वाच्या बातम्या
- Laxman Hake : मराठा आरक्षण आंदोलनापुढे हतबल होऊन ओबीसींचे आरक्षण संपवले, लक्ष्मण हाके न्यायालयात दाद मागणार
- cabinet meeting : दिव्यांगांच्या अर्थसहाय्यात एक हजार रुपयांची वाढ, मेट्राेला गती : राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय
- Navnath Ban : राऊतांनी राहुल गांधींच्या अपयशी प्रयोगांचे कौतुक थांबवावे- नवनाथ बन
- Gunaratna Sadavarte : मुख्यमंत्री ब्राह्मण समाजाचे आहेत म्हणून त्यांना टार्गेट करू नका; सदावर्तेंचा इशारा