विशेष प्रतिनिधी
मुंबई: धनंजय मुंडे यांना मंत्रिपद द्यायचे असेल तर प्रथम ज्ञानेश्वरी मुंडे, संतोष देशमुख यांच्यासह माझ्या अर्थात करूणा शर्माच्याही कुटुंबाला विष द्या. त्यानंतर त्यांना मंत्रिपद द्या, अशी मागणी करुणा धनंजय मुंडे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे. Karuna Munde
मुंबई उच्च न्यायालयाने कृषि साहित्य खरेदी प्रकरणात धनंजय मुंडे यांना दिलासा दिला आहे. त्यानंतर अजित पवार यांनी त्यांना पुन्हा मंत्रिपद देण्याचे संकेत दिलेत. वाल्मीक कराड प्रकरणात धनंजय मुंडे यांना क्लीनचिट मिळाल्यानंतर विशेषतः त्यांचा त्या प्रकरणाशी संबंध नसल्याचे सिद्ध झाल्यानंतर त्यांना पुन्हा मंत्रिपदावर संधी दिली जाईल, असे ते म्हणालेत. Karuna Munde
या पार्श्वभूमीवर करूणा शर्मा मुंडे म्हणाल्या की, अजित पवार बीड जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. ते धनंजय मुंडे यांना पुन्हा मंत्रिपद देण्याची भाषा करत आहेत. ते लोकप्रतिनिधी आहेत. पण धनंजय मुंडे लोकप्रतिनिधी नाही. ते फक्त त्यांचा विचार करतात. जिल्ह्यात महादेव मुंडे व संतोष देशमुख हत्या प्रकरणासारख्या अनेक घटना समोर आल्यात. धनंजय मुंडे यांनी शासन व प्रशासनाचा गैरवापर करत जिल्ह्यात काळा कारभार व साम्राज्य पसरवले आहे. त्यानंतरही तुम्ही अशा घाणेरड्या व्यक्तीला मंत्रिपद देण्याची गोष्ट करत आहात का? तुम्हाला येथील जनतेचे दुःख दिसत नाही का?
लोकप्रतिनिधी असताना त्यांनी महादेव मुंडे, संतोष देशमुख व माझ्या मुलाबाळांची काय अवस्था करून ठेवली होती हे इथे येऊन पाहा. तुम्हाला त्या माणसाविरोधात पुरावे हवे असतील तर मी देते. मला वेळ द्या. मी सर्व घेऊन येते. ते एकदा पाहा. त्यानंतर विचार करा. अशा घाणेरड्या व्यक्तीला मंत्रिपद देणे आम्ही सहन करणार नाही.
धनंजय मुंडे यांच्याऐवजी इतर कोणत्याही चांगल्या माणसाला मंत्रिपद द्या. कारण, धनंजय यांना मंत्रिपद देणे हे महाराष्ट्रातील जनता सहन करणार नाही. धनंजय यांच्यासह त्यांचे कार्यकर्ते अजूनही माजलेलेच आहेत, असेही करूणा शर्मा यावेळी बोलताना म्हणाल्या.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची 9 डिसेंबर 2024 रोजी निर्घृण हत्या करण्यात आली. या प्रकरणी माजी मंत्री धनंजय मुंडे यांचा विश्वासू वाल्मीक कराड याला अटक करण्यात आली आहे. त्याच्यावर मकोका अंतर्गतही कारवाई करण्यात आली आहे. सध्या तो सध्या बीड जिल्हा कारागृहात खडी फोडत आहे. त्याला तिथे व्हिआयपी ट्रिटमेंट मिळत असल्याचा आरोप केला जातो. पण पुढे काहीच होत नाही. या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने कृषि साहित्य खरेदी प्रकरणात धनंजय मुंडे यांना कथित क्लीनचिट दिल्यामुळे अंजली दमानिया यांच्यासह अनेकांनी संताप व्यक्त केला आहे.
Poison my family including Dnyaneshwari Munde, Santosh Deshmukh, Karuna Munde demands from Ajit Pawar
महत्वाच्या बातम्या
- राहुल गांधी दुसरे आंबेडकर होऊ शकतात ! उदित राज यांच्या विधानावरून संताप
- नागरिकांच्या समस्या समजून घेण्यासाठी खासदार मुरलीधर मोहोळ थेट जनतेशी थेट संवाद साधणार
- अजित पवार यांच्यावर पूर्ण विश्वास, कोकाटे यांनी फेटाळली राजीनाम्याची चर्चा
- मंत्र्यांचा राजीनामा, संजय शिरसाट म्हणाले सामनामध्ये बातमी आली याचा अर्थ कधीच होणार नाही!