विशेष प्रतिनिधी
मुंबई : अनेक लोकांना वाटलं की, माझी राख होत आहे, पण तेवढ्यात मी भरारी घेतली. ही भरारी का घेऊ शकलो? जेव्हा जेव्हा राखेचा क्षण आला, तेव्हा त्याला सकारात्मकतेने सामोरा गेलो, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. Devendra Fadnavis
मराठी पत्रकार संघाच्या वतीने मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फिनिक्स पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. श्री श्री रविशंकर यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. त्यांच्या जीवनावर आधारित व्हिडिओ बुकचे प्रकाशन करण्यात आले. या पुरस्कार सन्मानाला उत्तर
मी संकटाच्या प्रत्येक क्षणी सकारात्मक राहिलो आणि आव्हानांपासून कधीही पळ काढला नाही, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, माझ्या संपूर्ण राजकीय आयुष्यात दोनच गोष्टी मला इथपर्यंत घेऊन आल्या. यातील पहिली गोष्ट म्हणजे संयम आणि दुसरी गोष्ट सकारात्मकता. तुम्हाला सिक्रेट सांगतो, मी चिडलेलो आहे, असे तुमच्या लक्षात आले, तर समजायचे की मला भूक लागली आहे. मला जेव्हा भूक लागते, तेव्हाच चिडतो. मला काही खायला दिले की शांत होतो. बाकी मला फारसा राग काही येत नाही.
लोकांमध्ये असलेले चांगले गुण शोधण्याचा प्रयत्न आपण कायम केला असल्याचे त्यांनी सांगितले, “मला भेटलेल्या प्रत्येक व्यक्तीमध्ये काहीतरी चांगले आहे, हे पाहण्याचा प्रयत्न मी करतो. आणि कुठलेही काम माझ्याकडे आले, की ते सकारात्मकतेने करण्याचा प्रयत्न करतो, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
तुम्ही या पुरस्काराला ‘फिनिक्स’ नाव दिले आहे. पण मी काही राखेतून उभा झालेलो नाही. पण अनेक वेळा लोकांना असे वाटले की, माझी राख होत आहे, तेवढ्यात मी भरारी घेतली. ही भरारी का घेऊ शकलो? जेव्हा जेव्हा राखेचा क्षण आला, तेव्हा त्याला सकारात्मकतेने सामोरा गेलो. आव्हानांपासून कधी पळालो नाही. आव्हानांना सामोरे गेलो आणि त्यांचा सामना केला. माणसे झुंजवली नाहीत, त्यांचा द्वेष केला नाही आणि टोकाचे राजकारणही केले नाही. यामुळेच या कठीण परिस्थितीत मी एकेक पाऊल पुढे जात गेलो, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
दरम्यान, या कार्यक्रमाला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, कौशल्य विकास, रोजगार व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा, अध्यात्म गुरू श्री श्री रविशंकर आदी उपस्थित होते.
Positivity Helps Rise from the Ashes,” says Devendra Fadnavis
महत्वाच्या बातम्या
- Laxman Hake : मराठा आरक्षण आंदोलनापुढे हतबल होऊन ओबीसींचे आरक्षण संपवले, लक्ष्मण हाके न्यायालयात दाद मागणार
- cabinet meeting : दिव्यांगांच्या अर्थसहाय्यात एक हजार रुपयांची वाढ, मेट्राेला गती : राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय
- Navnath Ban : राऊतांनी राहुल गांधींच्या अपयशी प्रयोगांचे कौतुक थांबवावे- नवनाथ बन
- Gunaratna Sadavarte : मुख्यमंत्री ब्राह्मण समाजाचे आहेत म्हणून त्यांना टार्गेट करू नका; सदावर्तेंचा इशारा