विशेष प्रतिनिधी
जळगाव : हनी ट्रॅप प्रकरणात प्रफुल लोढाकडे काही महत्त्वाची माहिती किंवा पुरावे आहेत. ते त्याच्याकडून हस्तगत करता यावे किंवा ते इतरांना मिळू नये, यासाठी प्रफुल लोढा याला विविध गुन्ह्यात ताब्यात घेऊन अडकवण्यात आले आहे, असा आरोप त्यांनीराष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी केला आहे.
सध्या राज्यात हनी ट्रॅप प्रकरण चर्चेत असताना एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन एकमेकांवर टीका करत आहेत. मला खडसेंचा राग येत नाही पण त्यांची कीव येते, असे म्हणत गिरीश महाजन यांनी आज पुन्हा एकदा एकनाथ खडसे यांच्यावर निशाणा साधला होता. त्यामुळे आता एकनाथ खडसे यांनी गिरीश महाजन यांच्यावर पलटवार केला आहे.
माध्यमांशी संवाद साधताना एकनाथ खडसे यांनी दावा केला की, गिरीश महाजन यांच्या सांगण्यावरून माझ्या संपत्तीची आतापर्यंत पाच वेळा चौकशी करण्यात आली आहे. माझी काय चौकशी करायची ती करा, पण मंत्री गिरीश महाजन यांच्यामध्ये हिंमत असेल तर त्यांनी त्यांच्या संपत्तीची चौकशी करण्याची मागणी करून दाखवावी, असे आवाहन खडसे यांनी दिले. तसेच एका सेवा निवृत्त शिक्षकाच्या मुलाकडे एवढी संपत्ती कशी? मंत्री गिरीश महाजन यांचा व्यवसाय आहे तरी काय? असे प्रश्न देखील खडसे यांनी विचारले.
एकनाथ खडसे यांच्या मुलाच्या आत्महत्येची चौकशी करायला पाहिजे, अशी मागणी गिरीश महाजन यांनी केली आहे. यासंदर्भात प्रश्न विचारला असता, एकनाथ खडसे म्हणाले की, आपल्या मुलाच्या आत्महत्येबाबत त्यांना काय चौकशी करायची ते करू शकतात. माझा मुलगा गेल्यामुळे मला दुःख आहे, पण महाजन यांना मुलगा नसल्याने ते त्यांना कळणार नाही, असे म्हणत एखनाथ खडसे यांनी दावा केला
Praful Lodha was arrested in the honey trap case only because he had evidence, alleges Eknath Khadse
महत्वाच्या बातम्या
- Sanjay Shirsat : संजय शिरसाट यांच्या अडचणी संपेनात! सामाजिक न्याय खात्यात 1500 कोटींच्या टेंडर घोटाळ्याचा आरोप
- jayant patil : राजीनाम्यावर मौन सोडताना जयंत पाटील यांचे भाजप प्रवेशावर भाष्य
- Kaustubh Dhavase : मुख्यमंत्र्यांच्या गुंतवणूक व धोरण मुख्य सल्लागारपदी कौस्तुभ धवसे यांची नियुक्ती
- Shiv Sena dispute : शिवसेनेतील वादावर तीन महिन्यात निकाल, पक्ष आणि धनुष्य बाण चिन्हाचा होणार फैसला