विशेष प्रतिनिधी
मुंबई : Pratap Sarnaik मुंबईत टेस्ला कारहेचे पहिले शाेरूम सुरू झाले आहे. भारतातील पहिली टेस्ला कार खरेदी करण्याचा मान परिवहन मंत्री प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी मिळविला. त्यांनी नुकतीच टेस्ला कार विकत घेतली आहे. मात्र, ही टेस्ला कार खरेदी वादाच्या भाेवऱ्यात सापडली आहे.
महाराष्ट्र काँग्रेसने सरनाईक (Pratap Sarnaik) यांच्यावर टीका करताना म्हटले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वदेशीचा नारा दिला असून, त्याला केराची टोपली दाखवण्याचे काम राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक प्रताप यांनीच केले आहे. अमेरिकेची गाडी खरेदी करणे म्हणजे पंतप्रधान मोदींच्या आदेशाचे उल्लंघन नाही का? असा प्रश्न काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला.
सावंत यांनी ‘एक्स’वर पोस्ट करून सरनाईक यांना लक्ष्य केले आहे. ‘प्रताप सरनाईक यांच्यावर ‘ईडी’ने नोटीस बजावली होती. भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनीही सरनाईक यांचा भ्रष्टाचार उघड केला होता. आता प्रताप सरनाईक यांनी अमेरिकेच्या कंपनीने बनवलेली टेस्ला कार घेतली. त्यासाठी दिलेला पैसा काळा होता का पांढरा? अमेरिकेची कार घेताना कोणता पैसा वापरला याचे हे गुलदस्त्यात राहील’, असे सावंत यांनी म्हटले आहे. Pratap Sarnaik
दरम्यान, यावर प्रताप सरनाईक म्हणाले, भारतातील सर्वात पहिली टेस्ला कार मला विकत घेता आली, याचा अभिमान वाटतो. महत्वाचं म्हणजे ही टेस्ला कार कोणतंही डिस्काऊंट न घेता पूर्ण पैसे भरुन मी विकत घेतली आहे. टेस्ला कार मी माझ्या मुलाला नाही, तर नातवाला देत आहे. तो ही कार घेऊन शाळेत जाईल आणि सर्वांना पर्यावरणपूरक वाहन वापरण्याचा संदेश देईल, असे त्यांनी सांगितले.
Pratap Sarnaik’s Tesla Purchase Sparks Row; Accused of Rejecting Modi’s Slogan
महत्वाच्या बातम्या
- Laxman Hake : मराठा आरक्षण आंदोलनापुढे हतबल होऊन ओबीसींचे आरक्षण संपवले, लक्ष्मण हाके न्यायालयात दाद मागणार
- cabinet meeting : दिव्यांगांच्या अर्थसहाय्यात एक हजार रुपयांची वाढ, मेट्राेला गती : राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय
- Navnath Ban : राऊतांनी राहुल गांधींच्या अपयशी प्रयोगांचे कौतुक थांबवावे- नवनाथ बन
- Gunaratna Sadavarte : मुख्यमंत्री ब्राह्मण समाजाचे आहेत म्हणून त्यांना टार्गेट करू नका; सदावर्तेंचा इशारा