विशेष प्रतिनिधी
मुंबई : संभाजी ब्रिगेडचे माजी प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांना काळे फासण्यात आल्याची घटना रविवारी अक्कलकोट येथे घडली होती. याचे पडसाद विधानसभेत पडले. या प्रकरणात योग्य ती कारवाई आमच्याकडून करण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. Praveen Gaikwad
प्रवीण गायकवाड हे एका कार्यक्रमासाठी गेल्यानंतर शिवधर्म संघटनेच्या कार्यकर्त्यांनी त्यांना काळे फासत, त्यांना मारहाण करण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांच्या गाडीची तोडफोड करण्यात आली. तसेच त्यांच्यावर शाईफेक केल्याप्रकरणी 8 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणावरून विरोधकांनी विधानसभेत सत्ताधाऱ्यांना सरकारला प्रश्न केले. कॉंग्रेसचे आमदार विजया वडेट्टीवार यांनी प्रवीण गायकवाड यांना मारण्याचा उद्धेश होता, असा दावा सभागृहात केला आहे.
हल्ला करणाऱ्यांवर स्थानिक पोलिसांचे दुर्लक्ष का झाले? कोणतेही कारण नसताना प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला करण्यात आला. असे कार्यक्रम होत असताना त्याठिकाणी पोलीस बंदोबस्त का नव्हता? प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेल्या हल्ल्यामुळे आता राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे यासंदर्भात जे दोषी आहेत, त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे.” अशी मागणी विजय वडेट्टीवार यांनी यावेळी केली.
यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात माहिती दिली की, “मी स्वतः या प्रकरणाची संम्पूर्ण माहिती घेतली आहे. ‘तुम्ही संभाजी नाव का ठेवले? छत्रपती संभाजी नाव का नाही ठेवले? अशा वादातून ही शाईफेक त्यांच्यावर करण्यात आली आहे. पोलिसांना माहिती मिळताच तातडीने त्याठिकाणी पोहोचले. पोलिसांनी प्रवीण गायकवाड यांना विनंती केली की आपण या संदर्भात फिर्याद द्यावी. पण ते फिर्याद द्यायला तयार नव्हते. तरीही पोलिसांनी फिर्याद घेतली आणि त्याठिकाणी आरोपींना अटक केली.
अद्यापही आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहेत. जी घटना घडली आहे, त्यानुसार त्यांच्यावर कलम लावून त्यांना शिक्षा करण्यात येईल. त्यांच्यावर योग्य ती कारवाई आमच्याकडून करण्यात येईल.” असे स्पष्ट केले आहे.
Praveen Gaikwad attack case reverberates in the Assembly, Chief Minister assures of appropriate action
महत्वाच्या बातम्या
- बिहारमध्ये मतदार यादीच्या पुनर्निरीक्षणाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार
- Devendra Fadnavis मुंबईत पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणुकीमुळे आयटी, स्टार्टअप कंपन्यांचे रिव्हर्स मायग्रेशन, मुख्यमंत्र्यांची माहिती
- Ashish Shelar महाराष्ट्राचा गौरव गणेशोत्सव आता महाराष्ट्र राज्याचा महोत्सव, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांची घोषणा
- बिहारमध्ये मतदार यादीच्या पुनर्निरीक्षणाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार