विशेष प्रतिनिधी
पुणे : विधानसभा निवडणुकीनंतर आता ईव्हीएम मशीन आणि मतदानातील तफावत याची चर्चा सुरू आहे. काँग्रेस नेते नाना पटोले यांनी थेट निवडणूक आयोगाच्या कार्यप्रणालीवरच शंका घेतली आहे. त्यानंतर आता पराभूत उमेदवारांनी फेरमतमोजणीसाठी अर्ज केला आहे. या सर्व घडोमोडींवर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भाष्य केले आहे. ईव्हीएम मशीनवर जनतेचा विश्वास राहिला नाही. फेर पडताळणीचा काही फायदा होणार नाही मशीनमध्ये काही गुप्त कोड, प्रोगाम फीट केला आहे का? हे तपासले तरच खरी माहिती समोर येईल, असे चव्हाण म्हणाले.
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांची भेट घेतली. बाबा आढाव यांनी ईव्हीएमविरोधात घेतलेल्या भूमिकेला काँग्रेसने पाठिंबा दर्शवला. यासाठी मी मुंबईहून आल्याने पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले. यावेळी त्यांनी ईव्हीएम मशीनवर शंका उपस्थित करत महायुतीवर निशाणा साधला.
काय म्हणाले पृथ्वीराज चव्हाण?
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील जनतेने महाविकास आघाडीला 48 पैकी 31 जागा म्हणजे 65 टक्के जागा दिल्या. भाजपच्या 10 वर्षांच्या कारकिर्दीत जनतेने नकारात्मक शिक्कामोर्तब केले. त्यानंतर चार-साडेचार महिन्यांच्या कालावधीत इतका मोठा बदल होईल, असे कोणलाही वाटले नाही. राजकीय विश्लेषणातही ते दिसून आले नाही. महाराष्ट्रात सत्ता बदल होण्याचा सर्वांनाच आत्मविश्वास होता. पण आमदारांच्या पक्षांतराचा देखील काहीच फरक पडला नाही, यावर विश्वास बसत नाही. निवडणूक फ्री आणि फेअर होणे आवश्यक आहे, असे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.
फेर पडताळणीचा काही फायदा होणार नाही
पंतप्रधानानी निवडणूक आयुक्त बदलण्याचा निर्णय घेतला तेव्हा आम्हाला अंदाज आला होता. सत्ताधाऱ्यांनी लोकशाहीचा मुडदा पाडला आहे. निवडणुकीत पोलिसांचा गैरवापर करण्यात आला. पोलिसांकडून मतदान करून घेतले, असा आरोपही पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. ईव्हीएम मशीनवर जनतेचा विश्वास राहिला नाही. फेर पडताळणीचा काही फायदा होणार नाही, असे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. सर्वच्या सर्व व्हीव्हीपॅटच्या चिट्ठ्या मोजायला हव्यात अशी मागणी देखील त्यांनी केली.
Prithviraj Chavan said – Re-examination will not be beneficial
महत्वाच्या बातम्या
- Imtiaz Jalil : ईव्हीएमवर निवडणुका घेऊ नका, ताकद कळेल, इम्तियाज जलील यांचा सरकारला इशारा
- Waqf Board अधिकाऱ्यांनी परस्पर आदेश काढून दिला वक्फ बोर्डाला 10 कोटीचा निधी , कारवाई होणार
- अजित दादांचे हे नाव घेतले पण छगन भुजबळ स्पष्टच म्हणाले, मुख्यमंत्री होणं देवेंद्र फडणवीस यांचा नैसर्गिक हक्क
- Rajabhau waje ठाकरे गटाच्या खासदाराला स्वतःच्या गावातच गावबंदी