Pune Leopard Attack : पिंपरखेडचा नरभक्षक बिबट्या अखेर ठार, शार्प शूटरने अचूक टिपले

Pune Leopard Attack : पिंपरखेडचा नरभक्षक बिबट्या अखेर ठार, शार्प शूटरने अचूक टिपले

Pune Leopard Attack

विशेष प्रतिनिधी

शिरूर : Pune Leopard Attack शिरूर तालुक्यातील पिंपरखेड परिसरात नागरिकांच्या जीवावर बेतलेला नरभक्षक बिबट्या अखेर ठार करण्यात आला आहे. (Pune Leopard Attack) गेल्या काही आठवड्यांपासून या बिबट्याने परिसरात दहशत माजवली होती. सहा वर्षांच्या या नरभक्षक बिबट्याने दोन लहान मुले आणि एका वृद्ध महिलेचा बळी घेतल्यानंतर अखेर जिल्हा प्रशासनाने दिसताक्षणी गोळ्या झाडण्याचे आदेश दिले होते. मंगळवारी (४ नोव्हेंबर) रात्री उशिरा शार्प शूटरच्या कारवाईत या बिबट्याचा शेवट झाला.



काही दिवसांपूर्वी पिंपरखेड येथील पाच वर्षीय शिवन्या बोंबे हिला बिबट्याने ठार केले होते. त्यानंतर २२ ऑक्टोबरला जांबुत गावातील ७० वर्षीय भागाबाई जाधव या वृद्ध महिलेचा मृत्यू झाला. ताज्या घटनेत १ नोव्हेंबरला १३ वर्षीय रोहन विलास बोंबे या मुलाचा बळी घेतल्याने नागरिकांमध्ये प्रचंड संताप निर्माण झाला. वाढत्या हल्ल्यांमुळे नागरिकांनी आंदोलनाचे हत्यार उगारले होते आणि वनविभागाच्या गस्ती वाहनांसह स्थानिक बेस कॅम्पला आग लावली होती. Pune Leopard Attack

या घटनांनंतर जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी “दिसताक्षणी गोळी झाडा” असा आदेश दिला होता. वनसंरक्षक आशिष ठाकरे यांनी प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) नागपूर यांच्याकडून परवानगी मिळवून बिबट्याला जेरबंद किंवा ठार करण्यासाठी तातडीने मोहीम हाती घेतली. पुण्यातील पशुवैद्य डॉ. सात्विक पाठक यांच्या नेतृत्वाखाली शार्प शूटर जुबिन पोस्टवाला आणि डॉ. प्रसाद दाभोळकर तसेच वनविभागाची टीम तैनात करण्यात आली होती.

मंगळवारी दिवसभर कॅमेरा ट्रॅप आणि थर्मल ड्रोनच्या साहाय्याने बिबट्याचा मागोवा घेण्यात आला. रात्री सुमारे साडेदहाच्या सुमारास बिबट्या वनक्षेत्रात दिसून आला. त्याला बेशुद्ध करण्यासाठी डार्ट मारण्यात आला, पण तो निष्फळ ठरला. बिबट्या चवताळून पथकावर झेपावला. अखेर शार्प शूटरने अचूक नेम धरून गोळी झाडली आणि बिबट्याचा जागीच मृत्यू झाला.

http://youtube.com/post/UgkxBNY_oBZixExRhkmIG2ulJC6UUFB9_BDl?si=iN0wIQ3BhcMVu_UJ

वनविभागाने नंतर बिबट्याचे शव गावकऱ्यांना दाखवून संपूर्ण कारवाईबद्दल माहिती दिली. परिसरातील नागरिकांनी या मोहिमेतील यशानंतर दिलासा व्यक्त केला आणि प्रशासनाचे आभार मानले.

१२ आणि २२ ऑक्टोबरला पंचतळे येथे बेल्हे-जेजुरी मार्ग अडवण्यात आला होता. तर ३ नोव्हेंबरला मंचर येथे पुणे-नाशिक महामार्ग अडवून ग्रामस्थांनी तीव्र आंदोलन केले होते. २ नोव्हेंबरच्या घटनेनंतर तर परिसरात जाळपोळ आणि तोडफोड झाली होती. जवळपास १८ तास महामार्ग ठप्प ठेवण्यात आला होता.

आता बिबट्याचा धोका संपल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले असून, अशा घटना पुन्हा घडू नयेत म्हणून वनविभागाकडून प्रतिबंधक उपाययोजना राबवण्याची मागणी केली आहे.

Pune Leopard Attack  : Shoot at Sight, Man-Eating Leopard Shot Dead on Site by Sharp Shooter in Shirur

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023