वृत्तसंस्था
मुंबई : Sanjay Shirasatha राहुल गांधी राजकारण करण्यासाठी आलेत. कोण गेलं कोण राहिले याच्यापेक्षा त्यांना घटनेचे पुस्तक घेऊन फिरायचंय ,घटनेचे पुस्तक घेऊन त्यांना दाखवायचे आम्ही घटना मानणारे आहोत. ते ड्रामेबाजी करत आहेत, असा हल्लाबोल सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठांनी केला आहे.Sanjay Shirasatha
लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज परभणी येथे सोमनाथ सुर्यवंशी यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांच्याशी सुमारे २० ते २५ मिनिटे संवाद साधला. सोमनाथ सुर्यवंशी हा संविधानाचे रक्षण करणारा होता. तो दलित असल्यानेच त्याची हत्या करण्यात आली आहे. हा पोलीस कोठडीतील मृत्यू असून सोमनाथ सुर्यवंशी यांच्या हत्येला जबाबदार असणाऱ्यांना लवकरात लवकर कठोर शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी केली आहे.
यावर शिरसाठ म्हणाले, राहुल गांधी यांना लोकांच्या समस्येचं देणंघेणं नाही. त्यांना त्या कुटुंबीयांचं देणंघेणं नाही. त्यांच्या पक्षाला मिळालेला विषय तेच घेऊन चघळत बसतात. आम्ही सर्व लोकांचे नेते आहोत हे दाखवण्याचा ती प्रयत्न करतात. त्यांच्या नौटंकीला लोक जुमानणार नाहीत.
Rahul Gandhi’s Parbhani tour is drama, attacked by Sanjay Shirasatha
महत्वाच्या बातम्या
- वाळू माफियांची दादागिरी मोडून काढणार, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा इशारा
- Thackeray : ठाकरे गटाचा पुन्हा ईव्हीएम घोटाळ्याचा जप, निवडणूक आयोगाला म्हटले चोर
- अमरावतीहून कामाच्या शोधात पुण्यात आलेल्या कुटुंबावर काळाचा घाला, डंपरने फुटपाथवर झोपलेल्या 9 जणांना चिरडलं
- PM मोदींना कुवेतचा सर्वोच्च सन्मान, ऑर्डर ऑफ मुबारक अल कबीर प्राप्त करणारे पहिले भारतीय पंतप्रधान