विशेष प्रतिनिधी
कोल्हापूर : Ramdas Athawale राज ठाकरे- उद्धव ठाकरे, शरद पवार-अजित पवार हे एकत्र येण्याची शंका वाटते. मात्र, सध्या समाजाच्या ऐक्यासाठी रिपब्लिकन पक्षातील नेत्यांनी एकत्र येणे काळाची गरज बनली आहे. यासाठी प्रकाश (बाळासाहेब) आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडी विसर्जित करुन रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्षपद स्वीकारावे, मी मंत्रिपदाचा राजीनामा देऊन त्यांच्या नेतृत्वाखाली काम करण्यास तयार आहे, अशी खुली ऑफर केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री तथा रिपाईचे (आठवले गट) संस्थापक अध्यक्ष रामदास आठवले यांनी दिली.Ramdas Athawale
कोल्हापुरात पत्रकार परिषदेत बाेलताना आठवले म्हणाले, रिपब्लिकन पक्षांमध्ये ऐक्य हवे आहे. सध्या त्याची नितांत गरज आहे. समाजाच्या ऐक्यासाठी प्रकाश आंबेडकर यांनी त्यांचा वंचित बहुजन आघाडी पक्ष विसर्जित करुन रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्षपद स्वीकारावे. मी मंत्रीपदाचा त्याग करुन त्यांच्या नेतृत्वाखाली काम करायला तयार आहे. मला समाजापेक्षा मंत्रीपद महत्त्वाचे नाही. माझा पक्ष भाजपच्या सत्तेत असला तरी त्यांचे सगळेच विचार आम्ही स्वीकारतो असे नाही. माझा पक्ष आंबेडकरवादी विचारसरणीने चालत आहे.
रिपब्लिकन पक्षाच्या एक्याची चर्चा नेहमी हाेते. मात्र, पक्षातील गटतट एकत्र येत नाहीत. रामदास आठवले यांनी थेट बाेलल्यामुळे एक्याची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे.
Ramdas Athawale’s open offer to resign as minister and work under Ambedkar’s leadership
महत्वाच्या बातम्या
- Chhagan Bhujbal : छगन भुजबळ यांना इन्कम टॅक्स रेडची धमकी देत मागितली एक कोटींची खंडणी
- Gaja Marane : गजा मारणे टोळीला पोलिसांचा दणका, १५ अलिशान गाड्या जप्त
- Indraprastha Vikas Paksha : दिल्लीत ‘आप’ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांचा राजीनामा, ‘इंद्रप्रस्थ विकास पक्ष’ची घोषणा
- Indrayani Riverbed : चिखलीतील इंद्रायणी नदीपात्रात उभारण्यात आलेल्या ३६ बंगल्यांवर बुलडोझर