विशेष प्रतिनिधी
मुंबई : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर महाविकास आघाडीत प्रवेश करण्याची शक्यता आहे. आम्ही महाविकास आघाडी सोबत युती करावी सहकाऱ्यांच्या इच्छा असल्याचे त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
रविकांत तुपकर यांनी बुलढाणा मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढविली होती. या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. . ते तिसऱ्या क्रमांकावर राहिले असले तरी त्यांनी जवळपास अडीच लाख मतं मिळाली होती. ठाकरे गटाच्या नरेंद्र खेडेकरांना ३ लाख २० हजार मतं मिळाली. साधारण साडेतीन लाख मतं मिळवत शिंदेंचे उमेदवार प्रतापराव जाधव चौथ्यांदा खासदार झाले. Ravikant Tupkar in Mahavikas Aghadi ?
त्यांना सिंदखेड राजा मतदार संघातून आघाडी मिळाली होती.तर मेहकर विधानसभेतून बरोबरीची मते मिळाली होती. त्याच जोरावर आता त्यांनी विधानसभा निवडणूक लढण्याची घोषणा केली होती. बुलढाणा लोकसभेतील सहाही विधानसभा मतदार संघात शेतकरी संघटना उमेदवार उभे करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले होते.
khadakwasla : भाजपच्या बालेकिल्ल्यात अजित पवारांचा गनिमी काव्याचा प्रयत्न
शेतकरी नेते रविकांत तुपकर यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता. राजू शेट्टी यांच्या विरोधात भूमिका घेतल्यावरुन तुपकरांची हकालपट्टी करण्यात आली होती. त्यानंतर पुण्यात महाराष्ट्र क्रांतिकारी आघाडीची घोषणा करत बुलढाण्यातील सहा जागांसह २५ मतदारसंघात निवडणूक लढवण्याची तयारी तुपकरांनी केली आहे
मात्र काही दिवसांपूर्वी त्यांनी उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर जाऊन भेट घेतली होती. आता शरद पवार यांची भेट घेणार आहेत.
तुपकर म्हणाले, आम्ही महाविकास आघाडी सोबत युती करावी अशी सहकाऱ्यांची भावना आहे. २४ जागांची तयारी आम्ही करत आहोत. शेतकऱ्यांसाठी लढणारी मुले आमच्यासोबत आहेत त्यांना विधानसभेत पाठवावा अशी भावना आहे. मी बुलढाणा मधून लढावं अशी कार्यकर्त्यांची भावना आहे.उद्धव ठाकरे यांना भेटलो त्यांना ही विनंती केलीय. आज शरद पवार याना भेटून त्या संदर्भात चर्चा करणार आहे.
Ravikant Tupkar in Mahavikas Aghadi ?
महत्वाच्या बातम्या