विशेष प्रतिनिधी
छत्रपती संभाजी नगर: मराठा आंदोलक मनोज जरांगे कुणबी म्हणूनच मराठा आरक्षण घेण्यासाठी अडून बसले असताना आता मराठा क्रांती मोर्चाने त्यांना विरोध केला आहे.
मनोज जरांगे यांच्या उपोषणानंतर राज्य सरकारने जरांगेंनी केलेल्या 8 मागण्यांपैकी 6 मागण्या सरकारने मान्य केल्या असून हैदराबाद गॅझेटनुसार मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. परंतु, मराठा क्रांती मोर्चाने याला विरोध केला आहे. मराठा म्हणूनच आरक्षण घेणार आणि तेही 50 टक्के, अशी स्पष्ट भूमिका त्यांनी मांडली आहे.
मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक सुनील नागणे म्हणाले, आमचा मनोज जरांगे पाटील यांना विरोध नाही. पण, आम्ही मराठा म्हणूनच 50 टक्क्यांच्या आतून आरक्षण घेणार आहे. जर मराठा समाजाला कुणबी म्हणून आरक्षण देण्याचा प्रयत्न केला, तर ते टिकणार नाही. त्यामुळे करोडो मराठा बांधवांना त्याचा फायदा होणार नाही, असे नागणे यांनी म्हटले आहे.
सुनील नागणे म्हणाले, जर सरसकट हा शब्द वगळला गेला, तर मराठ्यांना आरक्षण कसे मिळणार? गेल्या 45 वर्षांपासून मराठा समाज आरक्षणासाठी संघर्ष करत आहे. मराठा म्हणून नोंद असलेल्यांना कुणबी म्हणून आरक्षण देणे कायद्याच्या कसोटीवर टिकणार नाही. मराठा आरक्षणाच्या आंदोलनासाठी अनेकांनी आपली घरेदारे विकली आहेत. तरीही त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न होत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
टीका करणाऱ्या लोकांनी त्यांच्या त्यागाकडे आणि परिस्थितीकडे लक्ष द्यावे. आजही त्यांची जमीन सावकाराकडे गहाण असून, स्वतःची प्रसिद्धी न करता ते समाजासाठी लढत आहेत, असे सांगून सुनील नागणे म्हणाले, जर मला आणि माझ्यासारख्या लाखो मराठा बांधवांना आरक्षण मिळत नसेल, तर मी माझा आणि त्यांच्या भविष्याचा विचार करणार आहे. मरण पण हटणार नाही याचा अर्थ कोणाच्याही विरोधात नाही, तर आरक्षणाबाबतची ही ठाम भूमिका आहे. मराठा म्हणून आरक्षण कसे दिले जात नाही, ते आम्ही बघतो.
Reservation Battle Intensifies: Maratha Kranti Morcha Rejects Quota Under Kunbi Category Manoj Jarange Patil
महत्वाच्या बातम्या
- Laxman Hake : मराठा आरक्षण आंदोलनापुढे हतबल होऊन ओबीसींचे आरक्षण संपवले, लक्ष्मण हाके न्यायालयात दाद मागणार
- cabinet meeting : दिव्यांगांच्या अर्थसहाय्यात एक हजार रुपयांची वाढ, मेट्राेला गती : राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय
- Navnath Ban : राऊतांनी राहुल गांधींच्या अपयशी प्रयोगांचे कौतुक थांबवावे- नवनाथ बन
- Gunaratna Sadavarte : मुख्यमंत्री ब्राह्मण समाजाचे आहेत म्हणून त्यांना टार्गेट करू नका; सदावर्तेंचा इशारा