विशेष प्रतिनिधी
मुंबई : Ram Shinde राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी कुख्यात गुंड नीलेश घायवळ याला माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या माध्यमातून पासपोर्ट मिळवून दिला, असा आरोप विधानपरिषदेच सभापती राम शिंदे (Ram Shinde) यांनी केला आहे.
राम शिंदे (Ram Shinde) या संदर्भात म्हणाले की, रोहित पवार हे दररोज खोटे बोलण्याचे काम करतात. नीलेश घायवळ प्रकरणात ते धादांत खोटे बोलत आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी माझा आणि घायवळचा संबंध असल्याचा आरोप केला होता. पण माझा त्याच्याशी कोणताही संबंध नाही. उलट, घायवळला पासपोर्ट मिळवून देणारे स्वतः रोहित पवारच आहेत.2019 च्या विधानसभा निवडणुकीत रोहित पवार यांनीच नीलेश घायवळ याला त्यांच्या प्रचारात उतरवले होते. त्या काळात त्यांनी घायवळचा वापर राजकीय फायद्यासाठी केला. आज मात्र तेच माझ्यावर आरोप करत आहेत, ही राजकीय ढोंगबाजी आहे.
राम शिंदे (Ram Shinde) म्हणाले की, रोहित पवारांनी 2019 साली कर्जत जामखेडमध्ये मला पराभूत करण्यासाठी रोहित पवार यांनी घायवळला आणले त्यांच्या वडिलांनीदेखील घायवळच्या घरी जाऊन भेट घेतली होती. या सगळ्यांच्या मगरपट्ट्यात बैठकाही झाल्या. नंतर कदाचित जमीन व्यवहारांवरून त्यांच्यात मतभेद झाले असतील. रोहित पवार आणि घायवळ यांचे कौटुंबिक संबंध होते. त्यांच्या आई-वडिलांसोबत घायवळचे अनेक फोटो आहेत. जेव्हा हे फोटो त्यांचे असतात, तेव्हा ते समाजकार्य असते; पण इतरांचे फोटो आले की तो गुंड ठरतो, हे दुटप्पी वर्तन आहे.
http://youtube.com/post/Ugkx_LoSRgkg6K5xWyuongVMS-xKxXH96waT?si=KvqgFoLbhcwsi78B
रोहित पवारांनी आरोप केला होता की तानाजी सावंत, चंद्रकांत पाटील आणि राम शिंदे यांनी घायवळला पासपोर्ट मिळवून देण्यासाठी मदत केली. हा खोटा आरोप आहे, असेही राम शिंदे म्हणाले. 2020 मध्ये घायवळला पासपोर्ट मिळाला होता आणित्याच्या मामान स्वतः स्पष्ट सांगितले आहे की हा पासपोर्ट रोहित पवारांनीच अनिल देशमुखांच्या माध्यमातून मिळवून दिला. महाविकास आघाडीच्या काळातच त्याला पासपोर्ट दिला गेला.
Rohit Pawar Helped Nilesh Ghaywal Obtain Passport, Alleges Ram Shinde
महत्वाच्या बातम्या
- Cooperation Minister, : लोकांना कर्जमाफीचा नाद, सहकार मंत्र्यांच्या असंवेदनशील विधानावर संताप, म्हणण्याचा अर्थ ताे नव्हता असा खुलासा
- Nitesh Rane : एमआयएमच्या नावाखाली हिरव्या सापांची वळवळ, पुन्हा सभा हाेऊ द्यायची का विचार करू, नितेश राणेंचा इशारा
- Ajit Pawar : तुम्हाला पाठीशी घालायला आम्ही मोकळे नाही, गैरप्रकार करणाऱ्यांना अजित पवार यांचा इशारा
- महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन निवडणुकीत रंगणार ‘पवार विरुद्ध मोहोळ’ सामना