Suresh Dhas : आमदार सुरेश धस यांच्या धनंजय मुंडे यांच्यावर आरोपांच्या फैरी

Suresh Dhas : आमदार सुरेश धस यांच्या धनंजय मुंडे यांच्यावर आरोपांच्या फैरी

Suresh Dhas

विशेष प्रतिनिधी

बीड : Suresh Dhas बीड जिल्ह्यातील कोणतेही प्रकरण घ्या त्यामागे आकाच असतो. धनुभाऊंना फक्त पालकमंत्रिपद दिसत आहे, असे म्हणत आमदार सुरेश धस यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर आरोपांच्या फैरी झाडल्या आहेत.Suresh Dhas

बीडच्या पोलीस अधीक्षकांची भेट घेतल्यानंतर ते म्हणाले, गेल्या पाच वर्षात पोलीस दलाचे खच्चीकरण झाले आहे. बीडमध्ये महादेव अॅप मध्ये देखील असाच प्रकार झाला. टेंभुर्णी गावात एकाच व्यक्तीच्या नावावर 9 अब्ज रुपयांचा व्यवहार झाला. याची ईडीची चौकशी व्हायला हवी होती. तेथे दोन अधिकारी होते त्यांची नावे एसपी यांना सांगितले आहेत. त्या ठिकाणी चांगले काम करणारे अधिकारी बाजूला काढले आणि निष्क्रीय लोकं ठेवली. या प्रकरणाचे धागे मलेशिया पर्यंत गेले आहेत. आज लेखी पत्र दिले आहे की बीड जिल्हा पोलीस दलातील पोलिसांची यादी द्या, बिंदूनामावली प्रमाणे बीड जिल्ह्यातील पोलिसांची संख्या मागवली आहे



मुंडे यांच्यावर आरोप करताना धस म्हणाले, परळी बाजार समितीने गाळे बांधले. त्याचे तीन वर्षांपासून उद्घाटन झाले नाही कारण ते गाळे गायरान जमिनीत उभारले आहेत. शिरसाळ्याला चौदाशे एकरच्या आसपास गायरान जमीनीवर आकाचे कार्यकर्ते तीनशे वीटभट्टी चालवत आहेत. एकूण सहाशे वीटभट्टी आहेत त्यातील तीनशे वीटभट्ट्या अनधिकृत जागेवर आहे. त्या ठिकाणी आठ एकरवर देवीचे मंदिर होते पण आता देवीला जाण्यासाठीच रस्ता शिल्लक नाही. ज्या ठिकाणी बंजारा समाजाची जागा होती, त्या समाजाला उठवून तिथे शॉपिंग कॉम्प्लेक्स उभारले आहेत

आका आता नवीन पॅटर्न वापरत आहेत असा आरोप करत धस म्हणाले, आनंद चॅरिटेबल ट्रस्टला अडीच एकर जमीन मिळाली आहे. परंतु तेथे काहीही होऊ दिले जात नाही .त्या मागे कोण आहे हे पहा. आणखी खूप आहे, हळूहळू अनेक लोकं पुढे येत आहेत. आम्ही बघत असतो रश्मिका मांधाना, सपना चौधरी यांचे कार्यक्रम आयोजित केले जातात. ज्यांना इव्हेंट मॅनेजमेंट पॉलिटीक्स करायचे असेल त्यांनी परळीला यावे. गायरान जमीनीवर पूर्ण ताबा घ्यायचा हा सुद्धा एक परळी पॅटर्न आहे
परळीत राख माफिया देखील मोठ्या प्रमाणात असल्याचे सांगत धस म्हणाले, थर्मल मधून जी राखेची गाडी निघते त्यावर कोणीतरी टोल वसूल करत आहेत

धनुभाऊ आपले विमान 60 हजरावरुन खाली आणा. तुम्हाला राजकारण सुचते आहे. फक्त पालकमंत्री व्हायचे आहे. आमचे लेकरू मेले त्याला न्याय द्यायचा, तुला कोणी घेरले आहे ? हा काही राजकीय विषय नाही, या मोर्चात वंजारी समाजाचे लोक सहभागी होणार आहेत. मुस्लिम लोक सहभागी होणार आहेत.

आम्ही मोर्चात सहभागी होणार आहोत. संतोष देशमुख यांना न्याय मिळवून देणे हेच आमचे मिशन आहे . वाल्मीक कराड यांच्याशी माझे कसे संबंध कसे होते ते उद्या सांगतो, अशी धस म्हणाले.

अमोल मिटकरी लहान आहे. तू कोणाच्या पण नादी लाग, पण माझ्या नादी लागू नको. तुझे लय अवघड होईल, असा इशाराही धस यांनी दिला.

Round of allegations against MLA Suresh Dhas’s on Dhananjay Munde

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023