विशेष प्रतिनिधी
शरद पवारांवर बोलताना मी जी भाषा वापरली ती गावागाड्याची भाषा आहे. या भाषे मुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो, असे आमदार सदाभाऊ खोत यांनी म्हटले आहे. मात्र दिलगिरी व्यक्त करताना पुन्हा एकदा शरद पवारांना टोला मारला आहे.
सांगली जिल्ह्यातील जतमध्ये गोपीचंद पडळकर यांच्यासाठी महायुतीची सभा पार पडली. या सभेत सदाभाऊ खोत यांनी शरद पवार यांच्या शारीरिक व्यंगावरुन टीका केली होती. खोत सभेत बोलताना म्हणाले होते की, पवारसाहेबांना मानावं लागेल, कारण ते म्हणतायत की मला महाराष्ट्राचा चेहरा बदलायचाय. कसला? तुला तुझ्या चेहऱ्यासारखा पाहिजे का? देवेंद्र फडणवीस यांना का घेरायला लागलेत माहिती आहे का? आपल्या घरात गाय असते तशी राज्याची तिजोरी आहे. शरद पवार, उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे लोक घेरतायत, कारण देवेंद्र फडणवीस म्हणत होते गायीचं सगळं दूध वासरांचं आहे, मी सगळं दूध वासरांना देणार.
पवार साहेबांना नववा महिना लागला आणि कळा सुटल्या, ते म्हटले माझ्या चिल्यापिल्यांचं कसं व्हायचं… पवारसाहेब तुमच्या चिल्यापिल्यांनी कारखाने हाणले, सुतगिरण्या हाणल्या, बँका हाणल्या… पण तरी पवारसाहेबांना मानावं लागेल, कारण ते म्हणतायत की मला महाराष्ट्राचा चेहरा बदलायचाय. कसला? तुला तुझ्या चेहऱ्यासारखा पाहिजे का?’ असं वादग्रस्त विधान सदाभाऊ खोत यांनी यावेळी केलं. ज्यावरून आता वादाला तोंड फुटलं आहे.
यावर बोलताना खोत म्हणाले, एखादा आभाळाकडे बघून बोलायला लागला तर आम्ही म्हणतो आरशात जाऊन तोंड बघा. पण तरीही या भाषेमुळे कुणाच्या भावना दुखवले असतील तर ते दिलगिरी व्यक्त करतो. कारण गावाकडची भाषा समजण्यासाठी गावाच्या मातीत राबव लागत , खपावं लागतं मरावं लागत. तेव्हा ती भाषा समजते.
खोत यांच्या वक्तव्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचा शरद पवार गट आक्रमक झाला होता. पुण्यातील त्यांचे पत्रकार परिषद उधळून लावण्याचा इशाराही दिला होता. अजित पवार गटानेही यावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या होत्या. उपमुख्यमंत्री अजित पवार, सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी संताप व्यक्त केला आहे. प्रकारची वक्तव्ये आम्ही कदापीही खपवून घेणार नाही, असा इशारा वळसे पाटील यांनी दिला आहे.
Sadabhau Khot Apologizes as it is ‘Rural Dialect