विशेष प्रतिनिधी
मुंबई : Sanjay Raut येत्या काही दिवसांत भारत आणि पाकिस्तानमध्ये क्रिकेट सामना होणार आहे. मात्र हा सामना होऊ देणं म्हणजे देशद्रोहच म्हणावा लागेल, असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे. तसेच या सामन्याविरोधात शिवसेना पक्षाच्या महिला पदाधिकारी रविवारी सिंदूर आंदोलन करणार आहेत. Sanjay Raut
१४ सप्टेंबर रोजी अबुधाबी येथे भारत पाकिस्तान क्रिकेट सामना खेळवण्यात येणार आहे. यात भारतीय क्रिकेट बोर्डाने देखील सहभाग घेतला आहे. मात्र भारतातील लोकांच्या जनभावना या सामन्याच्या विरोधात आहेत. जे २६ लोकं पहलगाममधील हल्ल्यात मारले गेले होते, त्यांच्या कुटुंबियांचा आक्रोश अजून संपलेला नाही. यातील अतिरेकी सुद्धा अद्याप सापडलेले नाहीत. ऑपरेशन सिंदूर अजूनही चालू असल्याचं सांगितलं जात आहे. अशा वेळी हा सामना खेळवणे कितपत योग्य आहे? असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे.
खून आणि पाणी एकत्र वाहणार नाही असे म्हणत पाकिस्तानला जाणारे सिंधू नदीचे पाणी बंद केले. मग खून आणि क्रिकेट एकत्र चालेल का? असा आमचा प्रश्न असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. आमच्या महिलांचे उजाडलेले सिंदूर एवढ्या लवकर विसरलात का? हा काय प्रकार आहे? भारतीय जनता पक्ष, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि विश्व हिंदू परिषद या सर्वांना आमचा सवाल आहे की, त्यांची भारत-पाक क्रिकेट सामन्याविषयी काय भूमिका आहे? हे त्यांनी स्पष्ट करायला हवे, अशी मागणी संजय राऊत यांनी केली आहे. Sanjay Raut
शिवसेना पक्षाच्या महिला आघाडीच्या वतीने ‘माझे कुंकू माझा देश’ अशा प्रकारचे आंदोलन त्या दिवशी केले जाणार असल्याची माहिती संजय राऊत यांनी दिली. हे आंदोलन १४ तारखेला होणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले. या आंदोलनानंतर घराघरातून सिंदूर नरेंद्र मोदी यांना पाठवण्याचे अभियान आम्ही राबवणार असल्याचे संजय राऊत यांनी सांगितले. Sanjay Raut
‘India-Pakistan match is a kind of treason’; Sanjay Raut
महत्वाच्या बातम्या
- Laxman Hake : मराठा आरक्षण आंदोलनापुढे हतबल होऊन ओबीसींचे आरक्षण संपवले, लक्ष्मण हाके न्यायालयात दाद मागणार
- cabinet meeting : दिव्यांगांच्या अर्थसहाय्यात एक हजार रुपयांची वाढ, मेट्राेला गती : राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय
- Navnath Ban : राऊतांनी राहुल गांधींच्या अपयशी प्रयोगांचे कौतुक थांबवावे- नवनाथ बन
- Gunaratna Sadavarte : मुख्यमंत्री ब्राह्मण समाजाचे आहेत म्हणून त्यांना टार्गेट करू नका; सदावर्तेंचा इशारा