Sanjay Raut : नवी मुंबईतील 50 हजार कोटींच्या भूखंड घोटाळ्याचा मलिदा शिंदे–शिरसाटांच्या खिशात, संजय राऊत यांचा आरोप

Sanjay Raut : नवी मुंबईतील 50 हजार कोटींच्या भूखंड घोटाळ्याचा मलिदा शिंदे–शिरसाटांच्या खिशात, संजय राऊत यांचा आरोप

Sanjay Raut

विशेष प्रतिनिधी

मुंबई : नवी मुंबईतील 50 हजार कोटींच्या भूखंड घोटाळ्याचा मलिदा शिंदे–शिरसाटांच्या खिशात गेला. त्यातील 20 हजार कोटींचा वाटा त्यांनी घेतला तर 10 हजार कोटी थेट दिल्लीतील ‘बॉस’कडे गेले, असा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला आहे. राष्ट्रवादी काॅंग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांच्यावर 5 हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचाराचा खळबळजनक आरोप केलाय. संजय शिरसाठ यांनी 5 हजार कोटी रुपयांची 150 एकर जमीन नवी मुंबईतील बिवलकर कुटुंबाला दिली. 2024 साली सिडकोचे अध्यक्ष होताच संजय शिरसाट यांनी बिवलकर कुटुंबाला जमीन देण्याच्या आदेशावर सही केल्याचे रोहित पवार यांनी म्हटले आहे.



वनखात्याच्या मालकीची तब्बल 5 हजार एकर जमीन एका बिवलकर नावाच्या व्यक्तीला दिल्याप्रकरणी राऊतांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सिडकोचे माजी अध्यक्ष संजय शिरसाट यांच्यावर थेट भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. या प्रकरणाला दिल्लीतून संरक्षण मिळत असल्याचेही राऊतांनी (Sanjay Raut) स्पष्ट करत, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना याबाबत पत्र लिहिल्याची माहिती दिली. ‘शिंदेंचे खरे बॉस दिल्लीमध्येच आहेत असा टोलाही त्यांनी लगावला. 5 हजार एकराचा भूखंड एकनाथ शिंदे आणि संजय शिरसाट यांनी बिवलकर नावाच्या व्यक्तीला दिला ज्याचा यावर अधिकारच नाही. मुंबई-रायगडमधील जमिनींचे भाव पाहिले तर 50 हजार कोटी रुपयांचा हा व्यवहार धर्मदाय किंवा सामाजिक कार्य म्हणून केलेला नाही, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे

संजय राऊत म्हणाले की, अमित शहा यांच्याकडे बोट दाखवले जात आहे. त्यांनी या घोटाळ्याची नुसती चौकशी नाही तर एकनाथ शिंदे आणि संजय शिरसाट यांना बडतर्फ करायला हवे असे पत्र मी गृहमंत्री शहा यांना लिहले आहे. अंतुले यांचे पद पत्रकारांमुळेच गेले होते म्हणून असे विषय धरुन ठेवण्याची पत्रकारांचीही जबाबदारी आहे. मीडियाने हा विषय चालवत ठेवला पाहिजे. हजारो प्रकल्पग्रस्त लोकांना जमीन मिळत नाही. 5 हजार एकर जमीन एका व्यक्तीला दिली जाते, ती संजय शिरसाट आणि एकनाथ शिंदे याच्या आदेशाने. त्यांच्यावर गुन्हे दाखल केले पाहिजे, अशी मागणी संजय राऊत यांनी केली आहे. शहांवर आरोप करत असलो तरी ते गृहमंत्री आहेत म्हणून त्यांना मी पत्र लिहले आहे.
संजय राऊत म्हणाले की, सिडकोने ही जमीन बिवलकरांची ही जमीन नाही हे सांगण्यात घालवले.सुप्रीम कोर्टाचे तेच म्हणणे असताना हे सर्व काही डावलून जेव्हा 5 हजार एकर जमीन देण्याचा निर्णय होतो तेव्हा हे 50 हजार कोटी रुपये गेले कुठे? हे दिल्लीपर्यंत गेले हे त्यांचेच लोक सांगत आहे. कोर्टाचा स्टे असताना नगरविकास खात्याचे मंत्री एकनाथ शिंदे आणि संजय शिरसाट यांनी संगनमताने ही जमीन बिवलकरांना दिली आहे. सिडकोच्या अधिकाऱ्याचा यासाठी विरोध होता. प्रकल्पग्रस्तांना जमिनी दिल्या जात नाही. हे आदेश काढण्याच्या हेतूनं 25 दिवसांसाठी संजय शिरसाट यांना सिडकोचे अध्यक्ष करण्यात आले. हा 25 दिवसांमध्ये हा निर्णय घेण्यात आला. तेव्हाचे संबंधित मंत्री आणि सिडको अध्यक्ष यांना 20 हजार कोटी रुपयांचा मलिदा त्यावेळी मिळाला आहे. यातील 10 हजार कोटी दिल्लीमध्ये त्यांच्या बॉसला देण्यात आले आहे.

संजय राऊत म्हणाले की, भ्रष्टाचाऱ्यांचा, घोटाळेबाजांना संरक्षण देणारे सरकार महाराष्ट्रात अमित शहा यांच्या आशीर्वादाने सुरू आहे. ज्यांनी कारवाई करावी ते गृहखाते राज्यात अन् देशात भाजप कडेच आहे. म्हणून घोटाळेबाजांना संरक्षण मिळत आहे. 50 हजार कोटीच्या घोटाळ्याचे पुरावे देवेंद्र फडणवीस यांना हवे असतील तर त्यांनी सिडकोचे तत्कालीन अध्यक्ष विजय सिंगल, डिगीकर यांना का बदलून जावे लागले कारण त्यांनी सही करण्यास नकार दिला. सिडकोच्या अध्यक्ष पद संजय शिरसाट यांना देण्यात आले आणि त्यांच्याकडून 5 हजार एकराचा भूखंड एकनाथ शिंदे आणि संजय शिरसाट यांनी हा भूखंड बिवलकर नावाच्या व्यक्तीला दिला ज्याचा यावर अधिकारच नाही.

Sanjay Raut alleges that the Rs 50,000 crore plot scam in Navi Mumbai is in the pockets of Malida Shinde-Shirsat

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023