विशेष प्रतिनिधी
मुंबई : शिवसेना ठाकरे गट आणि मनसे यांच्या युतीच्या चर्चेत शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे आणि राज ठाकरे खासदार संजय राऊत यांना कटाक्षाने बाजुला ठेवत आले आहेत. याचे कारण आता समाेर आले आहे. ठाेकून देण्याची सवय असलेल्या संजय राऊत यांनी आज एक वक्तव्य केले. त्यामुळे मनसेकडून संताप व्यक्त झाल्यावर मेसेज करून राज ठाकरे यांच्याकडे खुलासा करण्याची वेळ संजय राऊत यांच्यावर आली. Sanjay Raut
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ठाकरे गट व मनसे यांच्यात युतीच्या चर्चा सुरू आहेत. यामध्ये राज ठाकरे यांची काॅंग्रेसला साेबत घेण्याची इच्छा आहे, असे वक्तव्य संजय राऊत यांनी साेमवारी पत्रकारांशी बाेलताना केले. संजय राऊत यांच्या या विधानानंतर राज ठाकरे यांची काँग्रेससोबत जाण्याची इच्छा असल्याचा अर्थ काढण्यात आला. यानंतर मनसेच्या नेत्यांनी माध्यमांसमोर भूमिका मांडत तीव्र प्रतिक्रिया दिल्या. यानंतर याप्रकरणी गैरसमज वाढल्याचे लक्षात येताच संजय राऊत यांनी तातडीने राज ठाकरे यांना मेसेज पाठवला.
या मेसेजमध्ये संजय राऊत यांनी मी असे काहीही बोललो नाही, असे स्पष्ट केले आहे. माझ्या वक्तव्याचा तो अर्थ नाही, असे त्यांनी राज ठाकरे यांना कळवले आहे. यामुळे संजय राऊत यांच्या विधानामुळे निर्माण झालेला गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केल्याचे बोललं जात आहे. तसेच यामुळे मनसे आणि ठाकरे गट यांच्यातील संभाव्य राजकीय जवळीक टिकवण्याचा प्रयत्न असल्याचे बोलले जात आहे.
मात्र, यामुळे युतीच्या चर्चेत संजय राऊत यांना बाजुला ठेवण्याचे कारण समाेर आले आहे. दरराेज सकाळी पत्रकार परिषद घेण्याची सवय लागलेले संजय राऊत हे काेणताही मागचा पुढचा विचार न करता बाेलून जातात. त्यामुळे आत्तापर्यंत शिवसेना ठाकरे गट अनेकदा अडचणीत आला आहे. मात्र, राज ठाकरे हे खपवून घेणार नाहीत, हे देखील आजच्या प्रसंगाने स्पष्ट झाले आहे.
Sanjay Raut Forced to Apologize After Controversial Remarks on Raj Thackeray
महत्वाच्या बातम्या
- Cooperation Minister, : लोकांना कर्जमाफीचा नाद, सहकार मंत्र्यांच्या असंवेदनशील विधानावर संताप, म्हणण्याचा अर्थ ताे नव्हता असा खुलासा
- Nitesh Rane : एमआयएमच्या नावाखाली हिरव्या सापांची वळवळ, पुन्हा सभा हाेऊ द्यायची का विचार करू, नितेश राणेंचा इशारा
- Ajit Pawar : तुम्हाला पाठीशी घालायला आम्ही मोकळे नाही, गैरप्रकार करणाऱ्यांना अजित पवार यांचा इशारा
- महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन निवडणुकीत रंगणार ‘पवार विरुद्ध मोहोळ’ सामना