विशेष प्रतिनिधी
मुंबई : मराठा आरक्षण आंदोलनात मनोज जरांगे यांच्या मागण्या मान्य झाल्याने मराठा समाजाने विजयाचा गुलाल उधळला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढलेल्या तोडग्याचे कौतुक होत आहे. मात्र त्यामुळे विरोधकांची कोंडी झाली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत गेल्या अनेक दिवसांपासून सरकारवर टीका. करत होते. मात्र आता या मुद्द्यावर बोलणार नसल्याचे त्यांनी म्हटलं आहे.
मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईतील उपोषणाला यश आले आहे. पाच दिवसांच्या उपोषणानंतर राज्य सरकारने जरांगेंनी मराठा समाजासाठी केलेल्या आठपैकी सहा मागण्या केल्या आहेत. याबाबत संजय राऊत यांनीही बोलणे टाळले आहे. हा सरकार आणि जरांगे यांच्यातील मुद्दा आहे. त्यामुळे आता आम्ही सुद्धा याबाबत काहीही बोलणार नाही, असे राऊत यांनी सांगितले.
प्रसार माध्यमांशी संवाद साधताना राऊत म्हणाले की, मराठा आरक्षणाच्या चर्चेमध्ये विरोधकांना किंवा विरोधी पक्षातील नेत्यांना कुठेही सहभागी करून घेतले नाही. सरकारमधील प्रमुख घटकांना सुद्धा घेतले नाही. जे वाशीला गुलाल उधळत होते ते सुद्धा या चर्चेत किंवा शेवटच्या टप्प्यात दिसले नाही, असेमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे आंदोलन, चर्चा, वाटाघाटी या फक्त भाजपाच्या छत्राखाली होतील आणि त्याचे श्रेय भाजपाला मिळेल, यासाठी अथक प्रयत्न केले.
मनोज जरांगे पाटील हे खूश होऊन गेले असलतील तर याचा अर्थ त्यांना त्यांच्या मागण्या मान्य झालेल्या आहेत. आता इतर अभ्यासकांचे जे काही म्हणणे आहे, तो त्यांचा मुद्दा आहे. यामध्ये शिवसेना ठाकरे गट आता आपले या क्षणी व्यक्त करणार नाही. मराठा समाजातील तरुणांना मनोज जरांगे पाटील म्हणतात, त्याप्रमाणे लाभ झाला असेल किंवा होणार असेल तर त्याचे आम्ही स्वागत करतो, असेही राऊत म्हणाले.
Sanjay Raut on Maratha Reservation: “Will Speak Later, Not Now”
महत्वाच्या बातम्या
- Laxman Hake : मराठा आरक्षण आंदोलनापुढे हतबल होऊन ओबीसींचे आरक्षण संपवले, लक्ष्मण हाके न्यायालयात दाद मागणार
- cabinet meeting : दिव्यांगांच्या अर्थसहाय्यात एक हजार रुपयांची वाढ, मेट्राेला गती : राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय
- Navnath Ban : राऊतांनी राहुल गांधींच्या अपयशी प्रयोगांचे कौतुक थांबवावे- नवनाथ बन
- Gunaratna Sadavarte : मुख्यमंत्री ब्राह्मण समाजाचे आहेत म्हणून त्यांना टार्गेट करू नका; सदावर्तेंचा इशारा