विशेष प्रतिनिधी
मुंबई : औरंगजेब हा उत्तम प्रशासक होता. त्याच्या काळात भारताचा जीडीपी 24% पर्यंत होता अशी मुख्तफळे समाजवादी पक्षाचे नेतेआबू आझमी यांनी उधळली आहेत. आबू आझमी यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे.
छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यावरील छावा चित्रपटाची सध्या देशभरात चर्चा आहे. औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांचा छळ करून वाढ केल्याच्या दृश्यावर प्रेक्षकांच्या डोळ्यात पाणी येते. मात्र समाजवादी पक्षाचे आमदार आबू आझमी यांनी औरंगजेबाच्या काळात भारताचा जीडीपी 24 टक्के होता, भारताची सीमा अफगाणिस्तानापर्यंत होती, आणि भारताला सोने की चिडियाँ म्हटले जात होते, असे वक्तव्य केले आहे.
आबू आझमी म्हणाले की, औरंगजेब हा उत्तम प्रशासक होता. औरंगजेबाच्या जमान्यात भारताची सीमा अफगाणिस्तान आणि बर्मा पर्यंत होती. त्या काळात भारताचा जीडीपी 24% पर्यंत होता. भारत वर्षाला तेव्हा सोने की चिडियाँ म्हटले जात होते. हे सर्व खोटे आहे असे आम्ही म्हणणार आहोत का? अ
औरंगजेब आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्यातील लढाई ही धार्मिक लढाई नव्हती, तर त्यांच्यामध्ये राजकीय संघर्ष होता, असाही दावा आमदार आबू आझमी यांनी केला.
औरंगजेबाचे उदात्तीकरण योग्य नाही. आमदार आबू आझमी यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला पाहिजे, असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. भारतीय जनता पक्षाचे आमदार राम कदम यांनी आबू आझमी यांना इतिहास माहित नाही. विधानसभेत त्यांची भेट झाल्यानंतर त्यांना इतिहासाचे पुस्तक भेट दिले जाईल, असे आमदार कदम म्हणाले.
Says Aurangzeb is a good administrator, Eknath Shinde demands to file sedition case against Abu Azmi
महत्वाच्या बातम्या
- Devendra Fadnavis गतिमान आणि प्रगतीशील कायदा-सुव्यवस्था उभी करणार! अमित शहा यांच्यासोबत देवेंद्र फडणवीस यांची बैठक
- Russia : ”रशियाने युक्रेनमधील चेर्नोबिल पॉवर प्लांटवर हल्ला केला”
- PM Modi : पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यामुळे भारत-अमेरिका व्यापार संबंध अधिक मजबूत
- Manipur : मणिपूरमधील कॅम्पमध्ये सीआरपीएफ जवानाने केला गोळीबार अन् नंतर…