शरद पवारांची फसवणूक केली, शिंदेंच्या सत्कारावरून संजय राऊत यांचा आरोप

शरद पवारांची फसवणूक केली, शिंदेंच्या सत्कारावरून संजय राऊत यांचा आरोप

विशेष प्रतिनिधी

मुंबई : महाराष्ट्र सदन मध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या बॅनरखाली महादजी शिंदे पुरस्काराचा कार्यक्रम घेण्यात आला. लोकांचा गैरसमज झाला की मराठी साहित्य संमेलनाने हा पुरस्कार दिला. हा कार्यक्रम साहित्य संमेलनाचा नव्हता खाजगी कार्यक्रम होता. शरद पवार यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याची फसवणूक झाली, असा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला.

दिल्ली येथे शरद पवार यांच्या हस्ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे याना महादजी शिंदे पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. यावेळी शरद पवार यांनी शिंदे यांचे तोंड भरून कौतुक केले होते. तेव्हापासून ठाकरे गटाच्या नेत्यांनी टीका सुरु केली होती. शरद पवारांवरही नाराजी व्यक्त केली होती. यावर बोलताना राऊत म्हणाले, शरद पवार यांच्याशी कसला रुसवा फुगवा? एका विषयामध्ये आम्ही शिवसेनेच्या भावना व्यक्त केल्या आमच्याकडे अशा अनेक खाजगी संस्था पुरस्कार देत असतात. मराठी साहित्य परिषदेची परवानगी न घेता मराठी साहित्य संमेलनाच्या बॅनरखाली हा कार्यक्रम घेण्यात आला. संमेलनाचं नाव वापरून गैरवापर करून हा पुरस्कार देण्यात आला, येथे आमचा आक्षेप आहे. शरद पवार यांच्यासारख्या व्यक्तीला सुद्धा अंधारात ठेवलं गेलं. त्युमुळे नाराजी व्यक्त करणं ही लोकशाही आहे.

राऊत म्हणाले, आमचे एखाद्या व्यक्ती विषयीचे मत टोकाचे आहे. शरद पवार यांचा पक्ष फोडणाऱ्या लोकांबद्दल सुद्धा आमचं तेच मत आह आमचा पक्ष आणि शरद पवारांचा पक्ष, नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी या लोकांना हाताला धरून फोडला. या सगळ्या संदर्भात चर्चा शरद पवारांशी कशा बाबत करावी?आमचा आणि शरद पवार यांचे भांडण नाही. आम्ही आमचे मत मांडलं भूमिका मांडले. त्यांची भूमिका वेगळी असेल, आमची भूमिका मांडण्याचा आम्हाला अधिकार आहे तसा त्यांना सुद्धा आहे. शरद पवारांना टोला मारताना राऊत म्हणाले, एकनाथ शिंदें बाबत त्यांनी जे भाषण केले ते ऐतिहासिक आहे. असं काय महान कार्य केलं ? महाराष्ट्राला असं काय पुढे नेलं? महादजी शिंदे पुरस्कार देताना जे भाषण केलं ते इंटरेस्टिंग आहे.

सत्तेचा गैरवापर करून लोकांना दणका देऊन दिल्ली पुढे झुकणारे लोक आहेत. सरपटणारे लोक आहेत. त्यांना तुम्ही महादजी शिंदे पुरस्कार देता. त्या संस्थेची चौकशी व्हायला हवी, अशी मागणी त्यांनी केली.

सरहद संस्थेचा पुरस्कार देण्यात आला. महाराष्ट्र सदन त्यासाठी वापरला गेलं, शरद पवार यांना तसं वाटलं असेल की साहित्य संमेलनाचा तो कार्यक्रम आहे. एकंदरीत फसवणूक करून पुरस्कार शिंदे यांना दिला.यामागे गडबड आहे ती सगळ्यांना माहिती आहे. महादजी शिंदे यांच्या तोडीचे काम एकनाथ शिंदे यांनी काय केलं हे सांगायला हवं ज्यांनी पुरस्कार दिला त्यांनी किंवा ज्यांच्या हस्ते पुरस्कार दिला त्या शरद पवारांनी. शरद पवार यांच्याशी त्यानंतर दहा वेळेस माझं बोलणं झालं. मी पुरस्काराच्या नावाने जो खोटारडेपणा झाला तो मांडला. तो मांडताना आम्ही कोणाबद्दल राग लोभ व्यक्त केला नाही, असे राऊत यांनी सांगितले.

Sharad Pawar cheated, Sanjay Raut accused of honoring Shinde

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023