Ganesh Naik आम्ही बांगड्या भरल्या नाहीत… शिंदे गटाचे गणेश नाईक यांना प्रत्युत्तर

Ganesh Naik आम्ही बांगड्या भरल्या नाहीत… शिंदे गटाचे गणेश नाईक यांना प्रत्युत्तर

Ganesh Naik

विशेष प्रतिनिधी

ठाणे : ठाणे महापालिकेत सत्ता आणायची असेल तर ठाण्यातील रावणाचे दहन करावे लागेल असा हल्लाबाेल वनमंत्री गणेश नाईक यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केला हाेता. त्याला शिंदे गटाचे उपनेते विजय चौगुले यांनी प्रत्युत्तर दिले असून अंबानींच्या जीवावर मंत्रिपद मिळाले आहे. संधी मिळाली आहे तर जनसेवा करावी. कुणी आडवे करण्याची भाषा करत असेल, तर आम्ही बांगड्या भरल्या नाहीत. आम्हालाही आडवे करता येते, असा इशारा दिला आहे.

नवी मुंबई महापालिकेत मी पक्षाला सत्ता मिळवून दिली, ठाण्यातही मी सत्ता मिळवून देऊ शकतो. पण, त्यासाठी रावणाच्या अहंकाराचे दहन करावे लागले. त्यासाठी तुम्ही तयार आहात का, असे विधान वनमंत्री गणेश नाईक यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या बैठकीत केले हाेते. Ganesh Naik


आगामी पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपचे नेते आणि राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अप्रत्यक्ष इशारा दिला हाेताे. ठाणे महापालिकेवर सत्ता आणायची असेल तर रावणाच्या अहंकाराचे दहन करावेच लागेल, असं वक्तव्य त्यांनी केले आहे. Ganesh Naik

इतका अहंकार आला असेल, तर दसऱ्याला नवी मुंबईच्या रावणाचे दहन होईल. आम्ही महायुतीच्या माध्यमातून लढण्याचा प्रयत्न करत आहोत. मात्र कुणी अहंकाराची भाषा करत असेल, तर त्यांचा अहंकार आम्ही उतरवणार अशी टीका चौगुले यांनी गणेश नाईक यांच्यावर केली आहे.

We did not fill the bangles… Shinde group’s response to Ganesh Naik

महत्वाच्या बातम्या

 

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023