विशेष प्रतिनिधी
नवी मुंबई: Nitesh Rane खारघर येथे इस्तिमा जमात कार्यक्रमानंतर हिंदू तरुणांवर करण्यात आलेल्या हल्ल्यामध्ये शिवकुमार शर्मा या तरुणाचा मृत्यू झाला शिवकुमार शर्मा यांच्या अंगावर असलेल्या कपड्यावर जय श्रीराम लिहिले होते. त्यामुळे त्यांची हत्या केली का? या सगळ्याची चौकशी झाली पाहिजे, असा संशय मत्स्य व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केला.Nitesh Rane
राणे यांनी खारघर येथे जाऊन शर्मा यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, कुटुंबीयांच्या भावना समजून घेतल्या आहेतआमचे सरकार हिंदूत्ववादी विचाराचे आहे, असे खपवून घेणार नाहीतबलिक जमात बॅन आहे. यांनी कोरोना मध्ये ही प्रॅाबलेम केला होता. परवानगी ५० हजाराची घेवून लाखोंनी लोक कार्यक्रमाला आली होती
इस्तिमा जमात कार्यक्रमत जो धर्मगुरू आला होता. तो हिंदू विरोधी आहे. अशांवर कारवाई व्हावी. अशा कार्यक्रमाला बंदी पाहिजे, अशी मागणी करत राणे म्हणाले, आयोजकांवर गुन्हा दाखल करा. असे कार्यक्रम करणाऱ्या संघटनांवर बंदी घातली पाहिजे.
नवी मुंबई खारघर येथे ३१ जानेवारी ते २ फेब्रुवारी दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या इस्तिमा जमात या कार्यक्रमात मार्गदर्शकांकडून दोन धर्मांमध्ये तेढ निर्माण करणारी भाषणे करण्यात आली असून या कार्यक्रमानंतर हिंदू तरुणांवर करण्यात आलेल्या हल्ल्यामध्ये शिवकुमार शर्मा या तरुणाचा मृत्यू झाला आहे. याबाबत पोलिसांनी गुन्हाही दाखल केला आहे मात्र आरोपींना अद्याप अटक करण्यात आलेली नाही. तरी या सर्व प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्काळ संबंधितांवर गुन्हे दाखल करून उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी राज्याचे राणे यांनी केली आहे.
इस्तीमा जमात या संघटनेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात दोन समाजामध्ये तेढ निर्माण करणारी भाषणे संबंधित नेत्यांकडून देण्यात आली. त्यामुळे हा कार्यक्रम संपल्यानंतर हिंदू तरुणांना लक्ष करून त्यांच्यावर हल्ले झाल्याचे प्रकार घडल्याचे नितेश राणे यांनी म्हटले आहे.
या हल्ल्यामध्ये शिवकुमार शर्मा या तरुणाचा मृत्यू झाला असून याबाबत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. मात्र अद्यापही आरोपींना अटक करण्यात आलेली नाही. तरी या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन करणाऱ्या आयोजकांची उच्चस्तरीय चौकशी करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावेत अशी मागणी नितेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
Shivkumar Sharma’s murder due to Jai Shriram was written on the cloth, suspicion of Nitesh Rane
महत्वाच्या बातम्या
- अंजली दमानिया यांच्यावर धनंजय मुंडे दाखल करणार फौजदारी अब्रुनुकसानीचा खटला
- पंतप्रधान नरेंद्र मोदी कुंभमेळ्यात, दिल्लीत आज मतदान
- Anjali Damania : अंजली दमानिया यांनी वाचला धनंजय मुंडेंच्या भ्रष्टाचाराचा पाढा, कृषीमंत्री असताना दुपटीहून दराने खरेदी
- Supriya Sule : पीकविमा योजनेतील भ्रष्टाचार प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई, खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रश्नावर केंद्रीय कृषिमंत्र्यांचे आश्वासन