Girish Mahajan : एखादी तरी नगरपंचायत निवडून आणून दाखवा, गिरीश महाजन यांचे एकनाथ खडसे यांना आव्हान

Girish Mahajan : एखादी तरी नगरपंचायत निवडून आणून दाखवा, गिरीश महाजन यांचे एकनाथ खडसे यांना आव्हान

Girish Mahajan

विशेष प्रतिनिधी

जळगाव : Girish Mahajan जिल्ह्यातील एखादी तरी नगरपंचायत निवडून आणून दाखवा असे आव्हान जलसंपदा मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते एकनाथ खडसे यांना दिले आहे.



महाजन (Girish Mahajan)  म्हणाले, आता एकनाथ खडसेंचे काहीही शिल्लक राहिले नाही. जिल्ह्यात निकाल लागल्यानंतर कुणाची ताकद किती अर्थात ठाकरे गटाची ताकद किती, काँग्रेसची ताकद किती व शरद पवारांच्या पक्षाची ताकद किती हे कळेल. खडसेंनी जिल्ह्यातील एखादी तरी नगरपालिका निवडून आणून दाखवावी.

राज्यातील 246 नगरपरिषदा व 42 नगरपंचायतींसाठी येत्या 2 डिसेंबर रोजी निवडणूक होणार आहे. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे 3 डिसेंबर रोजी मतमोजणी होऊ निकाल जाहीर होणार आहे. या पार्श्वभूमीवर गिरीश महाजन व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार एकनाथ खडसे यांच्यात राजकीय कलगीतुरा रंगला आहे. महाजन म्हणाले, कोण ओळखतो त्या खडसेला? त्यांनी काही दिवसांपूर्वी मुक्ताईनगरात आपली ताकद कमी झाल्याचे म्हटले होते. त्यांचे बरोबरच आहे. ते काहीही चुकीचे म्हणाले नाहीत. खडसे राष्ट्रवादीचे नेते आहेत. ते असे म्हणत असतील तर त्यांचे बरोबरच आहे.

महाजन म्हणाले, एकनाथ खडसे सध्या कोणत्या पक्षात आहेत हे ही कळत नाही. त्यांच्याविषयी बोलण्यासारखे आता काहीही राहिले नाही. खडसेंनी लोकसभा निवडणुकीत आपल्या सुनेला मदत केल्याचा दावा केला. ते प्रत्येक निवडणुकीत स्वतःची भूमिका बदलत असतात. एकमेकांना शिव्या द्यायच्या आणि घरातल्या घरात राजकारण करायचे असे त्यांचे सध्या चालले आहे. आत्ता मुक्ताईनगरमध्ये आमचे मित्र चंद्रकांत पाटील हे वेगळे लढत आहेत.

जळगाव जिल्ह्यातील जामनेरमध्ये गिरीश महाजन यांच्या पत्नी साधना महाजन यांनी सोमवारी नगराध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला. यावेळी भाजपने जोरदार शक्तिप्रदर्शन केले. महाजन गत काही दिवसांपासून आपल्या कुटुंबातील सदस्यांना नगराध्यक्षपदासाठी स्थान देण्याच्या दिशेने प्रयत्न करत होते. त्यात त्यांना यश आले आहे. साधना महाजन यांनी यापूर्वीही जामनेरच्या नगराध्यक्षा म्हणून काम केले आहे. त्यामुळे त्यांना हे पद नवे नाही. भाजपने सोमवारी अधिकृत उमेदवारी जाहीर केल्यानंतर त्यांनी आपली उमेदवारी दाखल केली.

Show me how to elect a Nagar Panchayat, Girish Mahajan challenges Eknath Khadse

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023