विशेष प्रतिनिधी
मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित थकीत ४००० कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमा मिळाव्यात यासाठी एसटीमधील वेगवेगळ्या अठरा संघटनांची महाराष्ट्र एसटी कामगार संघटना कृती समिती आक्रमक झाली आहे. सोमवारपासून आझाद मैदानावर धरणे आंदोलन सुरू होणार आहे. ST employees
आर्थिक मागण्यांवर कायमस्वरूपी तोडगा निघाल्याशिवाय आंदोलन मागे घेण्यात येणार नाही असा स्पष्ट इशारा महाराष्ट्र एसटी कामगारसंघटना कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. आंदोलनाबाबत रविवारी कृती समितीमधील सर्व श्रमिक संघटनांची बैठक मुंबईत झाली. आंदोलनावर ठाम राहण्याचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीला कृती समितीमधील हणमंत ताटे, श्रीरंग बरगे, संदीप शिंदे, हिरेन रेडकर, पांडुरंग वाघमारे, दादाराव डोंगरे, बंड ू फड, संतोष गायकवाड उपस्थित होते.
२०१८ पासून महागाई भत्ता फरक देण्यात आला नाही. सन २०२० ते २०२४ या कालावधीतील वेतनवाढ फरकाची रक्कम थकीत आहे. याशिवाय इतर अनेक रक्कमा थकीत असून एकूण ४००० कोटी रुपयांपेक्षा जास्त थकीत रक्कम कर्मचाऱ्यांना मिळालेली नाहीत. थकीत रक्कम कर्मचाऱ्यांना मिळण्यासाठी एक वेळचा पर्याय म्हणून सरकारने ही रक्कम एसटीला दिली पाहिजे अशी मागणीही कृती समितीच्या वतीने करण्यात आली आहे.
एसटीमधील महाराष्ट्र कामगार संघटना संयुक्त कृती समितीमधील १६ संघटना व अन्य एक महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेस या संघटनानी सोमवार १३ ऑक्टोबरपासून आंदोलनाच्या नोटीस दिल्या आहेत.
ST employees to protest at Azad Maidan from today, say they will not back down until a solution is found
महत्वाच्या बातम्या
- Cooperation Minister, : लोकांना कर्जमाफीचा नाद, सहकार मंत्र्यांच्या असंवेदनशील विधानावर संताप, म्हणण्याचा अर्थ ताे नव्हता असा खुलासा
- Nitesh Rane : एमआयएमच्या नावाखाली हिरव्या सापांची वळवळ, पुन्हा सभा हाेऊ द्यायची का विचार करू, नितेश राणेंचा इशारा
- Ajit Pawar : तुम्हाला पाठीशी घालायला आम्ही मोकळे नाही, गैरप्रकार करणाऱ्यांना अजित पवार यांचा इशारा
- महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन निवडणुकीत रंगणार ‘पवार विरुद्ध मोहोळ’ सामना