विशेष प्रतिनिधी
नागपूर : राज्यात पाच लाखांवर महिला मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेतून अपात्र ठरविण्यात आल्या आहेत. यावरून नाराजी व्यक्त होत आहे. भाजप नेते,माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यामध्ये लाडक्या बहिणींची चूक आहे, सरकारची नाही असे म्हटले आहे.
मुनगंटीवार म्हणाले, लाडकी बहीण योजना जाहीर झाली त्याचवेळी त्याचे सर्व निकष सरकारतर्फे जाहीर करण्यात आले होते. मात्र अनेकांनी ते पाळलेले नाहीत. मोठ्या प्रमाणावर अर्ज आल्याने त्यावेळी त्याची पडताळणी होऊ शकली नाही. आता पडताळणी होत असल्याने शेवटी यात सरकारची चूक नव्हे तर ज्यांनी ते निकष पाळले नाही. त्यांची ती चूक आहे.
दिल्लीतील विजयाबाबत मुनगंटीवार म्हणाले, दिल्ली विधानसभा निवडणुकीतील विजय हा केजरीवाल यांनी सर्व फुकट देत, विकास व प्रगतीला निर्माण केलेला अडसर दूर करणारा, विकासाला वेग देणारा आहे. तेलंगाना, महाराष्ट्र पाठोपाठ दिल्लीत डबल इंजिनचे सरकार आले असल्याने यापुढे बिहारमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीतही भाजप आणि नितीश कुमार यांचे सरकार सत्तेत येईल.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी या पराभवाबाबत पुन्हा एकदा वाढलेले मतदार, ईव्हीएम असा मुद्दा पुढे केला या संदर्भात विचारले असता नापास झालेल्या विद्यार्थ्यांसारखे ते बोलत आहेत. पराभवाची पूर्वतयारी करीत आहेत. फार गांभीर्याने त्यांना घेण्या गरज नाही. कर्म तैसे फळ त्यांना मिळाले आहे हेच सांगणारा हा निकाल आहे. जेव्हा जिंकतात तेव्हा त्यांना सर्व काही ऑल वेल असते असा टोला लगावला
Sudhir Mungantiwar clearly said, the fault of the Ladki Bahin, not the government
महत्वाच्या बातम्या
- अंजली दमानिया यांच्यावर धनंजय मुंडे दाखल करणार फौजदारी अब्रुनुकसानीचा खटला
- पंतप्रधान नरेंद्र मोदी कुंभमेळ्यात, दिल्लीत आज मतदान
- Anjali Damania : अंजली दमानिया यांनी वाचला धनंजय मुंडेंच्या भ्रष्टाचाराचा पाढा, कृषीमंत्री असताना दुपटीहून दराने खरेदी
- Supriya Sule : पीकविमा योजनेतील भ्रष्टाचार प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई, खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रश्नावर केंद्रीय कृषिमंत्र्यांचे आश्वासन