विशेष प्रतिनिधी
मुंबई : अजित पवारांच्या शब्दाला पक्षात किंमत नाही. सुनील तटकरे यांना राज्यात फिरू देणार नाही, असा संतप्त इशारा छावा संघटनेने दिला आहे. Sunil Tatkare
छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण केल्याप्रकरणी निलंबित केलेल्या अजित पवारांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सुरज चव्हाण यांचे पुन्हा एकदा पुनर्वसन करण्यात आले आहे. युवक प्रदेशाध्यक्ष असलेल्या सुरज चव्हाण यांना आता राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या प्रदेश सरचिटणीसपदी निवड करण्यात आली आहे. बुधवारी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, मंत्री छगन भुजबळ, आदिती तटकरे, नवाब मलिक, समीर भुजबळ यांच्या उपस्थितीत त्यांना नियुक्तीचे पत्र देण्यात आले. पण आता या नियुक्तीवरून विरोधकांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसवर टीका केली आहे. तसेच, ज्यांना मारहाण केली त्या छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे यांनीदेखील संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
विजय घाडगे म्हणाले की, “मला झालेल्या मारहाणीला अवघा एक महिनाही झाला नसताना सुरज चव्हाण यांना अशा पद्धतीने प्रमोशन देणे योग्य आहे का? अशी मारहाण करणाऱ्याला पक्षात स्थान नाही, असे अजित पवारांनी म्हटले होते. मग अजित पवारांच्या भूमिकेला डावलून सुनील तटकरे यांनी सूरज चव्हाण यांचे केलेले पुर्नवसन आहे का? असे अनेक प्रश्न आता निर्माण होतात. सुनील तटकरे यांना येणाऱ्या काळात राज्यामध्ये फिरताना नक्कीच छावा विरोध करेल,”
पावसाळी अधिवेशन सुरू असताना विधानसभेत मोबाईलवर रमी खेळणारे तत्कालीन कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अनेक ठिकाणी आंदोलनं झाली. लातूरमध्ये कार्यकर्ता संवाद कार्यक्रमानिमित्त आलेल्या प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंच्या कार्यक्रमात छावा या संघटनेचे पदाधिकारी पोहोचले. छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजय घाडगे यांनी कृषिमंत्र्यांचा राजीनामा मागितला आणि तटकरे यांच्या समोर पत्ते फेकले. यावेळी चिडलेल्या सूरज चव्हाण यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना घेऊन विजय घाडगे यांना मारहाण केली. विजय घाडगे यांना कोपऱ्यापासून लाथा-बुक्क्यांपर्यंत मारहाण करण्यात आली. त्यानंतर सूरज चव्हाण यांच्यावर कारवाई होऊन त्यांची राष्ट्रवादीच्या युवक प्रदेशाध्यक्षपदावरून हकालपट्टी करण्यात आली.
Sunil Tatkare will not be allowed to roam the state, Chhawa organization warns in anger
महत्वाच्या बातम्या
- ब्राझीलच्या राष्ट्रपतींचा PM मोदींशी संवाद; म्हणाले होते- मी ट्रम्पशी नाही तर मोदींशी बोलेन
- AI Avatar ब्रिटनचा पहिला ‘व्हर्च्युअल खासदार’: नागरिकांशी संवाद साधण्यासाठी खासदाराचा AI अवतार
- National Herald Case : नॅशनल हेराल्ड केस- राऊस अव्हेन्यू कोर्टात पुन्हा सुनावणी; आरोपपत्रावर कोर्टाने ईडीकडून मागितले स्पष्टीकरण
- Putin : पुतीन या वर्षाच्या अखेरीस भारत दौऱ्यावर येणार; रशियाकडून तेल खरेदीमुळे ट्रम्प यांनी भारतावर टॅरिफ लादला