विशेष प्रतिनिधी
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात सगळे काही आलबेल नाही हे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या राजीनाम्याच्या फुटलेल्या बातमीने स्पष्ट झाले. मात्र तरीही पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी यासाठी माध्यमांवरच आगपाखड केली आहे. एव्हडेच नव्हे तर विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला असून त्यांच्या जागी शशिकांत शिंदे यांची नियुक्ती झाल्याचे वृत्त शनिवारी पसरले होते. मात्र नंतर आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पाटील यांनी राजीनामा दिला नाही असे सांगितले.
जंयत पाटील यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला का? त्यांच्या राजीनाम्यावरुन संभ्रमाची स्थिती आहे, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. त्यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या की, “त्यांचा राजीनामा मी पाहिलेला नाही. वाचलेला नाही. तुमच्या चॅनलला बातमी देणारा जो सूत्र आहे, त्या सूत्राने दिलेली बातमी विचार करुन लावा. हा सूत्र खात्रीलायक नाही. शिवाय तुमच्या विश्वाहर्तेचा प्रश्न आहे. मी अशा कुठल्या राजीनाम्याबद्दल ऐकलेलं नाही. वाचलेलं नाही. उद्या पक्षाची बैठक आहे, त्यात कळेल. मी जयंत पाटलांशी रोज बोलते. जी घटना आमच्या आयुष्यात झाली नाही, त्या बद्दल काय बोलणार?”
प्रदेशाध्यक्ष बदलणार का? या प्रश्नावर सुप्रिया सुळे म्हणाल्या, “राजकीय पक्ष, संघटनेत जी जबाबदारी पडेल, तिथे प्रत्येक कार्यकर्ता काम करायला तयार आहे. जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड आणि शशिकांत शिंदे यांनी संघर्ष केलाय. कितीही आव्हान आली तरी कालही, आजही आणि उद्याही संघर्ष करायला तयार असतात” असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. राजीनाम्याची चर्चा विरोधकांनी घडवून आणली का? यावर “ज्या गोष्टीत वास्तव नाही, त्यात एवढा वेळ का घालवायचा?. प्रविणदादा, महागाई एवढे विषय आहेत.
महाराष्ट्रात एका मंत्र्याच्या घरी बॅगमध्ये कॅश दिसली, त्यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या, निर्मला सीतारमण आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाईट वाटलं असेल. निर्मलाजी सांगतात कॅश पासून दूर राहा. डिजीटल व्यवहार स्वीकारा. नोटबंदी झाली त्याचं काय झालं?. आमच्या निर्मलाताईंनी खूप विश्वासाने ब्लॅकमनी हद्दपार करण्यासाठी नोटबंदी आणली. त्या नोटबंदीचा पुढे काय झालं? मी दिल्लीला जाईन, तेव्हा हा प्रश्न विचारणार आहे. महाराष्ट्रातील चॅनल्सनी एका मंत्र्याच्या घरी बॅगमध्ये कॅश भरलेली असल्याच दाखवलं. पैशाचे व्यवहार कमी करण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करत असताना तिथे राज्यात कॅश सापडते हे चिंताजनक आहे. मी हा विषय अर्थमंत्रालयाकडे उपस्थित करणार आहे.
Supriya Sule lashes out at media over Jayant Patil’s resignation as state president
महत्वाच्या बातम्या
- बिहारमध्ये मतदार यादीच्या पुनर्निरीक्षणाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार
- Devendra Fadnavis मुंबईत पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणुकीमुळे आयटी, स्टार्टअप कंपन्यांचे रिव्हर्स मायग्रेशन, मुख्यमंत्र्यांची माहिती
- Ashish Shelar महाराष्ट्राचा गौरव गणेशोत्सव आता महाराष्ट्र राज्याचा महोत्सव, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांची घोषणा
- बिहारमध्ये मतदार यादीच्या पुनर्निरीक्षणाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार