विशेष प्रतिनिधी
हिंगोली: राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे आज हिंगोली दौऱ्यावर असताना शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचा ताफा रोखून आपला निषेध व्यक्त केला. भरणे यांचा ताफा येत असल्याचे पाहून शिवसैनिकांनी गनिमी कावा करत थेट रस्त्यावर उभे राहून गाड्या अडवल्या, त्यानंतर कृषिमंत्र्यांना काळे झेंडे दाखवले आहेत.
राज्यातील बहुतांश जिल्ह्यात अतिवृष्टी झाली असून मराठवाड्यासह विदर्भातील शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. त्याच पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांकडून ओला दुष्काळ जाहीर करावा, शासनाने त्वरीत पंचनामे करावे अशी मागणी होत आहे.
ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी कृषीमंत्र्यांना आंदोलक शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरत काळे झेंडे दाखवले. कृषिमंत्री दत्ता भरणे येत असल्याची माहिती मिळताच त्यांचा ताफा ठाकरे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी हिंगोलीत अडवला आहे.
ओला दुष्काळ जाहीर करावा, या मागणीसाठी ठाकरेंच्या शिवसेनेचे पदाधिकाऱ्यांनी हिंगोली वाशिम महामार्गावरील कान्हेरगाव गावाच्या शिवारामध्ये लपून बसले होते. वसीम देशमुख आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी कृषिमंत्री दत्ता भरणे यांचा ताफा अडवत त्यांना काळे झेंडे दाखवले.
Thackeray group’s guerrilla attack stops Agriculture Minister Dattatreya Bharne’s convoy
महत्वाच्या बातम्या